भंडारा/पालोरा (Farmer Andolan) : मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बु. येथे मानस अग्रो साखर कारखाना असून मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी ऊस पिकाची लागवड केली. त्यानुसार २०२४-२५ हंगामातील ऊसाचे गाळप झाले असून अजूनही (Farmer Andolan) शेतकर्यांना पाच महिने होऊनही ऊसाचे चुकारे मिळाले नाही. डिसेंबर महिन्यातील ऊसाचे चुकारे देण्यात आले. मात्र जानेवारी महिन्यापासून ऊसाचे चुकारे न केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
ऊस पिकाची लागवड करणार्या (Farmer Andolan) शेतकर्यांना ऊसाचे चुकारे मिळाले नसल्याने शेतीवर उचलेला कर्ज वेळेवर भरले गेले नसल्याने त्यांच्यावर व्याजासह रक्कम भरण्याची नामुष्की ओढवली आहे. ऊस पीक हा वर्षेभराचा आहे. त्यामुळे ऊसाची लागवड करणार्या शेतकर्यांना ऊसाचे चुकारे मिळाल्यानंतरच बॅकांचे कर्ज परतफेड करावे लागते. मात्र कारखाना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वेळेवर चुकारे होत नसल्याने शेतकरी विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे कारखाना प्रशासन शेतकर्यांना ऊसाचे चुकारे देईल का? की पुन्हा वर्षेभर कारखान्याचे चकरा माराव्या लागतील, हे वेळच ठरवणार आहे.
वेळेवर ऊसाचे चुकारे मिळत नसल्याने अनेक (Farmer Andolan) शेतकर्यांनी ऊसाची लागवड कमी केली असून नगदी मका पिकाची लागवड केली आहे. चार महिन्यात मका पिकाची फसल निघते आणि पैसे सुद्धा वेळेवर मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. मानस अग्रो साखर कारखाना येथील प्रशासक हे फक्त नावापुरते असून नागपूरवरून सूत्र चालतात. त्यामुळे नागपूरवरून सूचना मिळत नाही तोपर्यंत शेतकर्यांना ऊसाचे चुकारे मिळणार नसल्याने शेतकरी यांच्याविषयी खरोखरच जिव्हाळा असेल तर आठ दिवसांत शेतकर्यांना ऊसाचे चुकारे मिळणार, अन्यथा शेतकर्यांना ऊसाचे चुकारे मिळण्यासाठी (Farmer Andolan) आंदोलन करण्याची वेळ येईल का, अशा प्रश्न निर्माण झाला आहे.