अर्जुनी मोर (Mahatma Gandhi Tantamukt Gav Samiti) : मौजा खांबी पिंपळगाव येथील दिनांक 23 ऑगस्ट 2024 ला सरपंच नीरूपा बोरकर यांचे अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयांमध्ये (Mahatma Gandhi Tantamukt Gav Samiti) महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष यांची निवड करण्याचा विषय ठेवण्यात आला.
या विषयाला धरून गावातील ग्रामसभा सदस्यांनी (Tantamukt Gav Samiti) तंटामुक्त अध्यक्षांच्या पदाची निवड केली. यामध्ये पाच लोकांचे नाव समोर आली. त्यामध्ये विकास डुंबरे यांच्या नावाला एकमताने निवड करून त्यांना खांबी गावातील महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदावर निवड केली. त्यांच्या निवडीबद्दल नारायण भेंडारकर, विजय खोटेले, प्रमोद भेडारकर, भगवान मेंढे, वसंत खोटेले ,प्रकाश डुंबरे विनय खोटेले, रामलाल शिवणकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.




