यवतमाळ (Durga Festival) : २२ सप्टेंबर पासून दुर्गा उत्सवाला सुरुवात झाली. यवतमाळ शहरातील देशातील दुसर्या क्रमांकाच्या उत्सव पाहण्यासाठी भक्तांची गर्दी ओसंडून वाहाली भर पावसातही भाविकांची मांदियाळी यवतमाळ शहरात दाखल झाली होती. (Durga Festival) मोठ्या उत्साहात भाविक भक्तांनी आई आंबेचा जागर केला. मंगळवारी अनेक मंडळानी होमहवन करून अष्टमी साजरी केली.
दुर्गा उत्सवाला सुरुवात झाली काय ? आणि बघता बघता अष्टमीचा दिवस अस्ताला गेला काय ? दिवस कसे गेले हे कळलेच नाही. बुधवारी नवमिच्या दिवशी रात्री उशीरापासून दुर्गा विसर्जनाला सुरुवात झाली पुढील तिनं ते चार दिवस (Durga Festival) दुर्गा मातेचे विसर्जन सोहळा सुरू रहाणार आहे. आई अंबेच्या या पावन पर्वातील जागराला आता भाविक भक्तांना पुन्हा पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार असून नऊ दिवसांच्या आठवणी आपल्या स्मृतीमध्ये भाविकभक्त जपून ठेवतील.
जिल्ह्यासह यवतमाळ शहरात देशातील दुसर्या क्रमांकाचा (Durga Festival) दुर्गोत्सव साजरा होत आहे. यंदाही विविध दुर्गा उत्सव मंडळाच्या वतिने भव्य दिव्य देखावा तयार करून नवरात्र उत्सव मोठा उत्साहात साजरा केला गेला. जिल्ह्यात तीन हजार २०३ मंडळांनी सार्वजनिक दुर्गादवीची स्थापना केली होती. दुर्गा उत्सवामध्ये जिल्ह्यात भक्तीमय वातावरण अनुभव झाला असून मागील नऊ दिवसात यवतमाळ शहर रात्रभर मातेचे जागरण करत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत होते.
विविध जिल्ह्यातील व परराज्यातील भाविक यवतमाळात मोठ्या प्रमाणात (Durga Festival) दुर्गादेवीच्या दर्शनासाठी दाखल झाले होते.दर्शनासाठी येणार्या भाविकासाठी अनेक मंडळाच्या वतीने उपवासाचे पदार्थ , दुध, फळ, मसाले भात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. नऊ दिवस देवीची नित्य नेमाने आरती, पूजा करून १ ऑक्टोबर रोजीदेवी विसर्जनाला सुरवात झाली. तर काहींनी दसरा सण झाल्यावर देवींचे विसर्जन करणार आहे.
बुधवारी १ ऑक्टोबर रोजी भाविक भक्तगण दुर्गा मातेच्या मिरवणुकीत (Durga Festival) सामील झाले होते. अनेक मंडळे देवीला सोनी अर्पण करून दुर्गा मातेचे विसर्जन करणार आहे. जिल्ह्यात दुर्गा मातेचे विसर्जन ४ ऑक्टोबरपर्यंत होणार तर शारदा देवी विसर्जन ८ ऑक्टोबरपर्यंत आहे. मागील नऊ दिवसा पासून पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहिला मिळत होता.
दुर्गा मातेच्या विसर्जनाच्या (Durga Festival) निमित्ताने पुन्हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने तैनात राहणार आहेत. आई अंबेला निरोप देण्याचा वेळ येवून ठेपल्याने भक्तांमध्ये हुरहुर लागली असून आता पुन्हा उत्सवाच्या या अनुभवांशी एकरुप होण्यासाठी पुढील वर्षीची वाट पहावी लागणार आहे.