कधी अपचा अडथळा तर कधी नेटवर्कची समस्या!
मानोरा (E-Crop Inspection) : खरीप हंगामाला सुरुवात होऊन दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपून ६० ते ७० दिवसाचा काळही लोटला आहे. १५ सप्टेंबर पर्यंत ई – पीक पेऱ्याची शासनाकडून मुदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र कधी अपचा अडथळा तर कधी नेटवर्कची समस्यामुळे ई – पीक पाहणी नोंद (E-Crop Inspection) करण्यासाठी शेतकऱ्यांना कमालीची अडचण येत आहे. यामुळे ई – पीक पाहणी करण्यासाठी शासन स्तरावरून उपाय योजना करावी, अशी मागणी त्रस्त शेतकऱ्याकडून केली जात आहे.
शेतकऱ्यांना शेत बांधावर जाऊन पिकांची नोंदणी करणे बंधनकारक!
शेतजमीन पडीत आहे की पिकाखालील आहे, याची शाश्वती करून घेण्यासाठी शासन (Government) स्तरावरून ई – पीक पेरा नोंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी शासनाकडून ई – पीक पाहणी अप विकसीत करण्यात आला आहे. या अपमध्ये करून शेतकऱ्यांना शेत बांधावर जाऊन पिकांची नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र अपमध्ये होणाऱ्या अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना ई – पीक नोंदणीसाठी शेत बांधावर समस्या निर्माण होत आहे. कधी अपची अडचण तर कधी नेटवर्कची समस्या निर्माण होत आहे. यामुळे अनेक शेतकरी आजही ई – पीक नोंदणी पासून वंचित आहेत. ई – पीक नोंदणी करून घेण्यासाठी मदत कशी मिळणार या विवंचनेत शेतकरी दिसून येत आहे.
पिकासह जमिनीचे फोटो अपलोड करणे तसेच जिओ टेगीग करणे बंधनकारक!
शासनाने नुकसानीचा मोबदला बोनस, पीक कर्ज यासह अनेक योजनांसाठी ई – पीक पाहणी अनिवार्य केली आहे. परंतु अर्धा हंगाम लोटत चालला असतानाही नोंदणी होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली आहे. त्यामुळे या प्रक्रियेत सरकारने शेतकऱ्यांना मदत होईल असे पाऊल उचलावे, अशी मागणी सर्वत्र केली जात आहे. ॲपच्या माध्यमातून पेऱ्याची नोंदणी करण्यासाठी पिकासह जमिनीचे फोटो अपलोड करणे तसेच जिओ टेगीग करणे बंधनकारक आहे. त्यामुळेही ई – पेरा नोंदणीसाठी बांधावर जाणे गरजेचे असते. मात्र अपची अडचण आणि नेटवर्कची समस्या निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांना (Farmers) तासंनतास बांधावर राहूनही नोंदणी होत नसल्याने मनस्ताप सहन करून घेण्याची पाळी आलेली आहे.