तुमसर(Bhandara):- पतीच्या घरची परीस्थिती जेमतेम असताना पिपरीया आपल्या माहेरी विश्रांतीचे काही दिवस काढुन साडे आठ महिन्यांची गर्भवती (pregnant) महीला लक्ष्मी शहारे तालुक्यातील जंगल व्याप्त भागात असलेल्या घानोड येथे आपल्या स्वगावी चार दिवसांपूर्वी बाळंतपणासाठी आली.
पुराच्या पाण्यात गर्भवती महिला लक्ष्मी शहारे व आशा सेविका अडकल्या होत्या
साडे आठ महीन्याचे पोटात बाळ, व ओटी-पोटात होत असलेल्या असाहाय्य वेदनेने व्याकूळ झालेल्या लक्ष्मीने २२ जुलै रोजी बाळंतपणा साठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी धडपड करीत होती. पऱंतु सध्या तालुक्यात पावसाने (Rain)जोरदार हजेरी लावली असल्याने नदी नाले ओंसडुन वाहत आहे. त्यात घानोड गावाजवळील नाल्यावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत होते.व पुल पुराच्या पाण्याखाली आला होता. दरम्यान, सदर गर्भवती महिलेला उपचारासाठी(treatment) तालुक्यांच्या ठिकाणी जायचं होतं. पावसाळ्याचे दिवस असल्याने घरचे सदस्य शेतावर गेले असल्याने घरी कुणीच नव्हते. दरम्यान गावातील आशा स्वयंसेविका सोबत संपर्क करून पुढील उपचारांसाठी रुग्णालयात तालुक्यांच्या ठिकाणी जात असताना घानोड गावाजवळील नाल्यावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. दरम्यान पुराच्या पाण्यात गर्भवती महिला लक्ष्मी शहारे व आशा सेविका अडकल्या होत्या.
उपचारासाठी जाण्यासाठी धडपड करीत असताना गावात वेळेवर कुणीच उपलब्ध झाले नव्हते
साडे आठ महिन्याची गर्भवती महिला व आशा सेविका रुग्णालयात पुढील उपचारासाठी जाण्यासाठी धडपड करीत असताना गावात वेळेवर कुणीच उपलब्ध झाले नाही. दरम्यान तुमसर चे तहसीलदार (Tehsildar) मोहन टिकले तलाठ्यांसमवेत तुमसर तालुक्यात आपत्ती व्यवस्थापनाचा दौरा करीत असताना अचानक सदर गर्भवती महीला व आशा सेविका पुराच्या पाण्यातुन रुग्णालय (hospital) जाण्यासाठी वाट काढत होते. वेदनेने सहाय्य झालेली गर्भवती तहसीलदार टिकले यांना दृष्टीस पडली. त्यावेळी चक्क तहसीलदार मोहन टिकले यांनी लगतच्या गावातील नागरिकांसोबत भ्रमण ध्वनी वरुन संपर्क साधुन त्या गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यातुन काढण्यासाठी ट्रॅक्टर (tractor)बोलावुन घेतला. व सदर ट्रॅक्टरवर त्या आठ महिन्याच्या गर्भवती महिलेला व आशा सेविका ला बसवुन घेतले. व तहसिलदार टिकले यांनी आपल्या मध्यस्थीने गर्भवती महीला व आशा स्वयंसेविकाला सुखरुप पुराच्या पाण्यातुन बाहेर काढले.
पुढील उपचारासाठी आपल्या वाहनाने रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी गर्भवती महिलेच्या व आशा सेवीकेच्या चेहऱ्यांवर आनंदाश्रु आले. तालुका प्रशासनाचे प्रमुख तहसीलदार मोहन टिकले हे त्या साडे आठ महिन्याचा गर्भवती लक्ष्मी शहारेंसाठी वेळेवर देवदुत ठरले. हे मात्र नक्की.!