उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत सभा संपन्न
पुसद (Election Polling station) : आज उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तहसीलदार महादेवराव जोरवर यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदान केंद्र पुनर्स्थापना (Election Polling station) व सुसूत्रीकरण बाबत सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत सभा पार पडली. यामध्ये प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी आशिष भुजबळ यांनी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत मतदान केंद्र पुनर स्थापना व सुसूत्रीकरण बाबत चर्चा करून मार्गदर्शन केले. यावेळी १ जुलै 2024 या तारखेपासून पुनर्नरीक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव कमी करणे, नावात दुरुस्ती करणे, इत्यादी बाबत माहिती देण्यात आली.
सदर कार्यक्रम हे 25 जून 2024 ते 18 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये (Election Polling station) मतदारसंघ अंतर्गत दि. 27/7/2024 ते 28/7/2024,3/8/2024,4/8?/2024 या तारखांना विशेष शिबिर घेण्यात येणार आहे. तर दि.20/8/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी उपविभागीय अधिकारी तथा मतदान निर्णय अधिकारी आशिष बिजवल व तहसीलदार महादेवराव जोरवर यांनी उपस्थितांना दिली. यावेळी उपस्थित राजकीय प्रतिनिधींच्या सोबत मतदान केंद्र पुनर्स्थापना व सुसूत्रीकरण या संदर्भात चर्चा करण्यात आली.यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक साकिब शाह, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष जिया, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष दीपक सिंह परीहार व तालुका अध्यक्ष पंजाबराव भोयर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे लक्ष्मण कांबळे, अरुण पुलाते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विजय बाबर इत्यादी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनमोकळेपणे या बैठकीमध्ये चर्चा मसलत व सल्ला दिला.
यावेळी प्रामुख्याने पत्रकार दैनिक देशोन्नतीचे दीपक महाडिक, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष दीपक सिंह परीहार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष साकिब शहा, शेतकरी संघटनेचे प्रेम राव सरगर , मनोज कोलेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाचे लक्ष्मण कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विजय बाबर, रुपेश जाधव भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रवी पांडे, मनसेचे पदाधिकारी आकाश रहाटे,दिनेश खांडेकर, अंबादास वानखेडे यांच्यासह पुसद तहसील मधील निवडणूक विभागातील लिपिक देवानंद राठोड, निवडणूक विभागातील डाटा ऑपरेटर सत्यम, उपविभागीय कार्यालयातील शिपाई लोखंडे इत्यादी उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने महादेवराव जोरवर तहसीलदार यांनीही उपस्थितांना विस्तृत मार्गदर्शन केले व माहिती दिली.