अकोट (Electric shock) : दर्यापूर रोड अकोट येथील सागर अंबडकार यांच्या शेतात मजुरीने हरभर्याला पाणी देण्यासाठी स्प्रिंकलर उचलत असताना वरून जात असलेल्या ३३ के.व्ही. पणज फिडरच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाला. यामुळे शॉक लागून शुभम श्याम नाथे (२३) हा ७० टक्के जळाला आहे. अशा स्वरूपाची तक्रार जखमीचा भाऊ निलेश रामदास नाथे याने विद्युुत निरीक्षक, कार्यालय अकोला येथे केली आहे. ही (Electric shock) घटना सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजेदरम्यान घडली.
वास्तविक पाहता ३३ केव्ही विद्युत वाहिनी (Electric shock) ही जमिनीपासून १० मीटरपेक्षा उंच असणे आवश्यक आहे. परंतु कामामध्ये दिरंगाई करून बडा पगार घेणारे वि. वि. कंपनीचे बेजबाबदार अभियंते मात्र शेतकर्यांच्या जीवाशी खेळत आहेत. कारण विद्युत वाहिनीही जमिनीपासून १० मीटर उंच असण्याची अट असताना सागर अंबडकार यांच्या शेतातून जाणारी ३३ के.व्ही. पणज फिडर वाहिनी मात्र अवघ्या ७ फूट उंचीवर असून, विद्युत वाहिनी खाली लोंबकळत आहे. त्यामुळेच ही अपघाताची घटना झाली.
या बाबत संबंधित शेतकरी सागर अंबळकार यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी हे तार गेल्या तीन-चार महिन्यांपासून खाली लोंबकळत असल्याची तक्रार १० व १२ जानेवारी २०२५ रोजी पणज फिडरचे अभियंता आढे यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्या विभागाचे वायरमन गजबे यांनी स्वत: स्थळ पाहणी केली. पण आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळेच सदर (Electric shock) अपघात घडला व शुभम नाथे हा ७० टक्के जळाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तरी वरील अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी व शुभमला मदत करावी, अशा आशयाची तक्रार विद्युत निरीक्षक कार्यालय अकोला येथे अपघातग्रस्तचा भाऊ निलेश रामदास नाथे याने केली.