महिला धडकल्या विद्युत विभागाच्या कार्यालयावर आमदार मसराम यांनी महिलांशी केली चर्चा!
कोरची (Electricity Department) : 5 दिवसांपूर्वी कोरची तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे (Stormy Winds) तालुक्यातील बहुतेक ठिकाणी विद्युत पुरवठा (Power Supply) हा खंडित झालेला असून, त्याचे काम अतिशय थंड बसत्यात असल्याचे सांगत आज गुटेकसा येथील काही महिला वर्गांनी चक्क विद्युत विभागाचे कार्यालय (Electricity Department Office) गाठून जोपर्यंत आमच्या गावात विद्युत पुरवठा सुरळीत होणार नाही तोपर्यंत आम्ही हा कार्यालय सोडणार नसल्याच्या पवित्रा घेतल्या असल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती मिळताच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी कोरची येथील विद्युत विभागाच्या कार्यालयाला भेट देऊन सदर महिलांशी चर्चा केली व अधिकाऱ्यांना सुद्धा दूरध्वनीद्वारे धारेवर धरले.
कंत्राटदारांना मिळालेले काम हे योग्य वेळीच झाले पाहिजे असे आदेश!
कोरची तालुक्यातील बहुतेक ठिकाणी विद्युत पुरवठा हा मागील 5 दिवसांपासून खंडित असून बहुतेक नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागत असल्याचे दिसून येत आहे. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विषारी जीवजंतूचा सुद्धा मुक्त संचार बघितला जात असतो. यामुळे कधी पण मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून विद्युत विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्या अशा सूचना यावेळी आमदार रामदास मसराम (MLA Ramdas Masram) यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी द्वारे दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार देखभाल दुरुस्तीची कामे करण्याकरिता कोरची तालुक्यात तीन वेगवेगळ्या कंत्राटदारांना कामे देण्यात आली असून, कुठलाही कंत्राळदार हा कोरची तालुक्यात आपली सेवा बजावत नसून फक्त पैसे लाटण्याचे काम करीत असल्याचे सुद्धा दिसून आले. यामुळे सुद्धा आमदार यांनी नाराजी व्यक्त केली व कंत्राटदारांना मिळालेले काम हे योग्य वेळीच झाले पाहिजे असे सुद्धा आदेश यावेळी मसराम यांनी दिले.
कोरची तालुक्यातील जनतेने फक्त नरक यातनाच सहन करावी काय?
आज सकाळपासूनच गुटेकसा येथील महिलांनी विद्युत विभागाच्या कार्यालयात आपला ठिय्या मांडलेला होता. लहान लहान चिमुकल्यांना रात्रीच्या वेळी नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच काही दिवसांपासून तालुक्यात उकाळा सुद्धा प्रचंड वाढल्यामुळे नागरिकांचे हाल बेहाल होत असल्याचे दिसून येत आहे. सदर बाब ही गंभीर असून याकडे संबंधित विभागाचे वरिष्ठ हे दुर्लक्ष करीत असल्यामुळे कोरची तालुक्यातील नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्यात पहिले वोल्टेजचे (Voltage) कारण सांगून आता पावसाळ्यात झाड व फांद्यांचे कारण सांगितले जात असल्यामुळे कोरची तालुक्यातील जनतेने फक्त नरक यातनाच सहन करावी काय? जर लवकरात-लवकर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही तर कोरची तालुक्यातील जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन (Movement) करू अशा इशारा सुद्धा यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी दिला. यावेळी कोरची तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज अग्रवाल, कुरखेडा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जीवन नाट, माजी पंचायत समिती सभापती परसराम टिकले, रामसुराम काटेंगे, विठ्ठल शेंडे, जावेद शेख वडसा, वसीम शेख व गुटेकसा येथील गावकरी इत्यादी उपस्थित होते.