हिंगोली (Electricity Repair work) : जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून वातावरणात कमालीचा बदल घडला वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळल्याने सिद्धेश्वर धरणातून येणारा पाणीपुरवठा खंडित वीज पुरवठ्याने बंद झाला आहे. महावितरण च्या खांबावरील इन्सुलटर फुटल्याने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात बऱ्याच वेळा हिंगोली शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता मागील दोन ते तीन दिवसापासून वातावरणात कमालीचा बदल घडला. ज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. हिंगोली शहराला सिद्धेश्वर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे विजेच्या तारा तुटून खांबावरील काही इन्सुलेटर तूट फूट झाल्याने मागील तीन दिवसापासून हिंगोली शहरात निर्जळीला सामोरे जावे लागत आहे.
महावितरण कंपनीच्या वतीने वीज दुरुस्तीचे कामे युद्धपातळीवर सुरू आहे दुरुस्तीचे काम झाल्यानंतर लवकरच हिंगोली शहराचा पाणीपुरवठा सुरळीत चालू होणार असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी दिली आहे. मंगळवार सायंकाळपर्यंत महावितरणच्या वतीने जवळपास 25 इन्सुलेटर बसविण्यात आले आहेत. अद्यापही कोणत्या ठिकाणी बिघाड झाली आहे याचा अंदाज महावितरण ला लागत नसल्याने पाणीपुरवठा सुरू झाला नाही.सध्याची अवकाळी परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन देखील नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.