Yawatmal :- स्थानिक बसस्थानका समोरील सा. बां. वि.च्या जागेत गेल्या ३५-४० वर्षापासून छोटा मोठा व्यवसाय करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. शहरातील अनेक अतिक्रमण (Encroachment) धारक व्यावसायीकांची दुकान पर्यायी व्यवस्था करुन दिलेली आहे. परंतु बसस्थानका (Bus stand) समोरील रोडला लागुन असलेल्या दुकानदारांची अद्यापही पर्यायी व्यवस्था करुन देण्यात आली नाही. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करुन द्यावी.
दुकानदारांची अद्यापही पर्यायी व्यवस्था करुन देण्यात आली नाही
यासंदर्भात १३ ऑगस्ट पासुन तहसिल कार्यालय समोर दुकानदार उपोषणाला बसले आहे. या संदर्भात १२ ऑगस्ट रोजी सर्व लघुउद्योग संघटनेकडे ठाणेदार यांनी पोलीस कर्मचार्यांना पाठवून श्री चिंतामणीचे गेट समोर उभ्या असलेल्या पोलीस गाडीजवळ ठाणेदाराकडे बोलावून ह्या नोटीस घ्या व उपोषणाला बसू नका बसल्यास कसे बसता ते मी पहातो. तुम्हा सर्व दुकान दारांना पो.स्टे.ला जमा करतो. लवकरात लवकर जमा न झाल्यास उपोषणाचा (hunger strike)पेंडाल कसा टाकता ते मी पाहून घेईल. अशा प्रकारे धमकी दिली.
यापूर्वी निवेदन देण्यासाठी गेलो असता निवेदन स्विकारले नाही आमचे जीवीतास धोका झाल्यास याला प्रशासन जबाबदार राहील अशी जिल्हाधिकार्यांना १३ ऑगस्ट रोजी तक्रार देण्यात आली. निवेदनावर आशिष अरुणराव धोबे, हेमंत खंगार, प्रमोद अमृतकार, विनोद देऊळकर, शंकर वाटगुळे, राहुल बुरबुरे अशा ३२ दुकानदारांच्या स्वाक्षर्या आहेत.