मारेगाव (Engineer Girl suicide) : येथील प्रभाग क्रमांक १६ मधील अभियंता असलेल्या उच्चशिक्षित युवतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना आज रोजी सकाळी सात वाजताचे दरम्यान उघडकीस आली. (Engineer Girl suicide) घडलेल्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दिक्षा केशव उमरे (२७) मारेगाव असे गळफास घेवून आत्महत्या (Engineer Girl suicide) केलेल्या तरुणीचे नाव आहे. दिक्षा ही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करुन हैद्राबाद येथील कंपनीत जॉब करीत होती. मागील काही महिन्यापासून ती मारेगाव येथेच राहत होती. दिक्षाने टोकाचे पाऊल उचलत स्वगृही बेडरूममध्ये पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. (Engineer Girl suicide) आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून दिक्षा सारख्या उच्च शिक्षित तरुणीच्या आत्महत्येने शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दिक्षाच्या पश्चात आई, वडील, बहीण व बराच मोठा आप्त परिवार आहे.




