जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी काढले आदेश
हिंगोली (Extension Officer Vishnu Bhoje) : पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी दिगांबर ईश्वरराव गायकवाड हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाल्याने गटविकास अधिकारी पदी कोणाचीही नियुक्ती झाली नव्हती. त्यामुळे कार्यालयात येणार्या अभ्यंगतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी विस्तार अधिकारी विष्णु भोजे (Extension Officer Vishnu Bhoje) यांची सहाय्यक गटविकास अधिकारी पदी तात्पुरती नियुक्ती केली.
हिंगोली जिल्ह्यात अनेक अधिकार्यांच्या बदल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर शासनाकडून नियुक्ती केली जात नसल्याने आहे त्या अधिकार्यांना तात्पुरता पदभार देऊन काम भागविले जात आहे.हिंगोली पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी दिगांबर गायकवाड हे ३० जूनला नियतवयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. परंतु त्यांच्या रिक्त जागेवर अन्य कोणाचीही नियुक्त करण्यात आली नाही.
तसेच शासनाकडूनही नियुक्तीचे आदेश निघाले नाहीत. तब्बल ९ दिवसानंतर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी काढलेल्या आदेशात हिंगाोली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विष्णू भोजे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक गटविकास अधिकार्याचा पदभार सोपवावा असे आदेशात नमुद करण्यात आले आहे. त्यानुसार विष्णू भोजे (Extension Officer Vishnu Bhoje) यांनी हा पदभार घेतला आहे. त्यामुळे नवीन अधिकार्याची नियुक्ती होई पर्यंत त्यांना कामकाज पार पाडावे लागणार आहे.