सोनसाखळी चोरीची घटना ताजी असताना पुन्हा एका महिलेची फसवणूक
वसमत () : येथे एका महिलेला नकली सोन्याच्या बिस्कीटचे आमिष दाखवून तिच्या अंगावरील खर्या सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना मंगळवारी घडली आहे वसमत मध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण दुचाकीस्वाराने लांबवल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या (Fake Gold Crime) घटनेचा तपास लागण्यापूर्वीच पुन्हा एका महिलेला भामट्याने फसवले आहे त्यामुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण आहेत.
वसमत येथे मंगळवारच्या आठवडी बाजारात परभणी जिल्ह्यातील नंदगाव येथील द्रौपदीबाई कांबळे ही महिला फडे विक्री करण्यासाठी नेहमीप्रमाणे आली होती.मंगळवारी दुपारी त्यांना सोन्याचे बिस्किट सारखी वस्तू आढळली सोन्याची आहे म्हणून त्यांनी ती उचलली मात्र काही वेळाने तीन भामटे त्यांच्याकडे आले त्यांनी हे बिस्कीट मध्ये आमचाही हिस्सा आहे आम्ही देखील (Fake Gold Crime) बिस्कीट पाहिले आहे असे सांगत.याचे हिस्से करू म्हणून महिलेला भुरळ घातली.सोन्याच्या बिस्कीटातील अर्धा हिस्सा महिलेच्या अंगावरील दागिने देण्यासाठी महिलेला भाग पाडले. त्यावरून द्रौपदीबाई यांनी त्यांच्या अंगावरील चाळीस तोळे वजनाचे चांदीचेदंडकडे , सहा ग्राम वजनाचे सोन्याचे कानातले असा ७६ हजाराचा त्यांना दिला भामट्याने जाणून बुजून ज्या महिलेच्या अंगावर दागिने आहेत अशाच महिलेसमोर हे नकली सोन्याचे बिस्कीट टाकून डाव साधला हे आता स्पष्ट होत आहे.
सोन्याचे बिस्किट स्वस्तात मिळाले या आनंदात द्रोपदाबाई घरी गेल्या बिस्किटाची तपासणी केली असता (Fake Gold Crime) सोन्याचे बिस्कीट नसून नकली सोने असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भामट्यांनी नकली सोने देऊन फसवले असल्याचे त्यांच्या लक्षात आले अखेर त्यांनी वसमत शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वसमत पोलीस नकली सोने देऊन महिलेची फसवणूक करणार्या तीन भामट्यांचा शोध घेत आहेत वसमत मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत त्यामुळे खाजगी व्यापारी व नागरिकांच्या घरावरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून चोरट्यांचा शोध घेण्याची वेळ पोलिसांवर येणार आहे.
वसमत मध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण (Fake Gold Crime) दुचाकी स्वाराने ओढून घेऊन फरार झाल्याची घटना घडलेली आहे यापूर्वीही महिलेच्या अंगावरील दागिने लुटण्याच्या घटना घडल्या आहेत त्या घटनेचा तपास लागलेला नाही त्यानंतर आता पुन्हा एका महिलेला भामट्यांनी फसवले असल्याची घटना घडली आहे महिलांना फसवून त्यांची दागिने लंपास करणारी टोळी वसमत मध्ये सक्रिय झाली असल्याचे यावरून दिसत आहे वसमत शहरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत त्यामुळे पोलिसांना तपास कामी अडथळे येत आहेत.
खाजगी व्यापारी यांच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये फक्त दुकानदाराचे शटरची लॉक यावरच सीसीटीव्ही केंद्रित असतात त्यामुळे दूरपल्ल्याचे सीसीटीव्ही कोण्या व्यापार्याचे व रहिवाशाचे आहेत ते तपासण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. त्यामुळे चोरीचा शोध लावण्यापेक्षा सीसीटीव्हीचे कुठे शोधणे अवघड होऊन बसले आहे. वसमत शहरात सीसीटीव्ही नसल्याने चोरट्यांचे मात्र होत आहे.




