तुमसर तालुक्यातील हसारा टोली येथील घटना
तुमसर (Farmer commits suicide) : तालुक्यातील हसारा टोली येथील ५१ वर्षीय शेतकरी किशोर यादोराव चंद्रीकापुरे यांनी विषारी किटकनाशक औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा (Farmer commits suicide) संपविल्याची घटना समोर आली आहे. प्रकृती अचानक खालावल्यानंतर त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले.
भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना, दि. १२ जून २०२५ रोजी रात्री ११ वाजता दरम्यान डॉ. निर्वाण यांनी मृत घोषित केले. त्यानंतर संबंधित डॉक्टरांच्या लेखी मेमोवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे मर्ग नोंदविण्यात आला असून कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा मर्ग नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या (Farmer commits suicide) घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.(ता.प्र.)




 
			 
		

