Babhulgaon :- तालुक्यातील हस्तापुर येथील हरिदास झित्रुजी शिवरकार (वय ६०) या शेतकर्याने आज सकाळी शेतात विषारी औषध(poisonous drug) प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजताचे सुमारास उघडकीस आली.या घटनेची नोंद बाभुळगाव पोलीस ठाण्यात मर्ग क्र. ४१/२५ कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे.
शेतकर्याने शेतात विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या
पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, हरिदास शिवरकार हे हस्तापुर येथे असलेली स्वतःची दीड एकर शेती करत होते. त्यांनी यावर्षी शेतात कापूस आणि तूर पिके लावली होती. तसेच घर बांधकामासाठी त्यांनी उधारीत पैसे घेतले होते, जे पिकाच्या उत्पन्नातून फेडायचे ठरवले होते. मात्र यंदाच्या लहरी पावसामुळे पीक हातात आले नाही, यामुळे ते काही दिवसांपासून आर्थिक संकटात (Financial crisis) आणि मानसिक तणावात होते. आज सकाळी ते शेतात गेले होते. त्यांच्या पाठोपाठ पत्नी डबा घेऊन गेल्या त्यावेळी त्यांना पती शेतात बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. त्यांच्या जवळ मोनोसिल या विषारी औषधाची बाटली पडलेली होती व तोंडाला फेस आलेला होता. तातडीने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल असून पुढील तपास जमादार मंगेश कळसकर, निलेश भुसे आहे.