लहान मुलांसह वडील जखमी!
कोरची (Motorcycle Accident) : दिवाळीच्या सणानिमित्त सासुरवाडीला जाण्यास निघालेल्या देवरी तालुक्यातील पिंडकेपार ( चिचगड ) येथील रहिवासी तुलसी बंजार वय 35 वर्षे, त्यांच्या 6 आणि 4 वर्षाच्या मुलांना मोटारसायकल वरून घेऊन जात असताना कोरची येथील विद्युत केंद्राजवळ, तोल जाऊन तिघेही रस्त्याच्या कडेला पडले. मद्यसेवन केल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे.
जखमींना रुग्णालयात घेऊन गेल्याने जखमींना औषधोपचार मिळाले!
स्थानिक रहिवाशांनी वेळीच जखमींना रूग्णालयात घेऊन गेल्याने जखमींना औषधोपचार मिळाले. अपघाताची घटना गावात घडल्याने, वेळीच मदत मिळाली, अन्यथा जंगल परिसरात अपघात झाले असते तर वेळीच उपचार मिळाले नसते. असे स्थानिकांचे म्हणणे आहे. तुलसी बंजार हे आपल्या 6 वर्षाच्या रणवीर आणि 4 वर्षाच्या कबीर ला घेऊन सासुरवाडीला, बिहीटेकला ( कोरची तालुका) येथे जाण्यास निघाले होते. विद्युत केंद्राजवळ मोटारसायकल ( क्रमांक एम एच 35 आर 6881) चा तोल सुटला आणि तिघेही रस्त्याच्या कडेला पडले. अपघातानंतर, त्याच रस्त्याने जात असलेले व्यावसायिक घनश्याम अग्रवाल आणि प्रतिष्ठीत नागरिक शालीकराम कराडे या दोघांनीही जखमींना ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) घेऊन गेले. तेथील डॉ. नितेश वंजारी यांनी औषधोपचार केले. मुलांच्या हातापायाला, डोक्याला व हनुवटीजवळ दुखापत झाली असल्याचे व प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
