शेतकर्याचं नशिबच फाटकं, सर्व निसर्गानं हिरावून नेलं
भंडारा (Farmer Heavy Damage ) : निसर्गाचे संकट झेलताना शेतकर्यांच्या नाकी नऊ येत आहे. ‘इकडे आड, तिकडे विहिर’ अशी दयनिय अवस्था शेतकर्यांची झाली आहे. निसर्गाचा पाऊसही पिच्छा सोडायला तयार नाही. हातातोंडाशी आलेला घास शेतकर्याच्या तोंडातून हिरावला जात आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. (Farmer Heavy Damage) संततधार अतिवृष्टीचा फटका बसल्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यातही पाऊस कोसळत असल्याने धानासह सोयाबीन, कपाशी, मिरची, भाजीपाला व इतर पिकाचीही मोठी नासाडी झाली आहे. फळवर्गीय शेतीचीही तिच अवदशा होत आहे. यावर्षीचा खरीप हंगाम धोक्यात आला असून ‘तेल गेलं, तुपही गेलं अन् हातात धुपाटणं आलं’ असून शेतकर्याचं नशिबच फाटकं, सर्व निसर्गानं हिरावून नेलं आहे ही म्हण शेतकर्यांसाठी तंतोतंत खरी ठरत आहे.
यावर्षी सप्टेंबर महिन्यापाठोपाठ ऑक्टोबरमध्येही अतिवृष्टीचा कहर सुरू आहे. चार दिवस पाऊस थांबला व पुन्हा कोसळला. (Farmer Heavy Damage) अतिवृष्टी व परतीच्या पावसाने धानपिक, तूर, सोयाबीन, कपासी व भाजीपाला पिकाचेही नुकसान केले आहे. कापणीला आलेला धान भूईसपाट झालेला आहे. अजूनही शेतातील सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे काही शेतकर्यांच्या भूईसपाट झालेल्या धानाला कोंबे फुटली आहेत. तर काही शेतकर्यांनी भिजलेले व कापणी केलेले धानपिक बांध्याच्या धुर्यावर वाळविण्यासाठी ठेवले आहेत.
शेतीचा लागवड खर्च अवाढव्य झाला आहे. पण आता पिके घरी येतील की नाही याची शाश्वती राहिली नाही व पीक आलेही तरीपण ओल्या असलेल्या धानाला व्यापारी भाव देणार नाही. (Farmer Heavy Damage) शेतकर्याच्या परिस्थितीकडे कुणाचे लक्ष नाही. निसर्गाचा कोप सुरूच आहे. त्यामुळे शासनही ‘रोज मरे, त्यासाठी कोण रडे’ अशी भूमिका घेत आहे. निसर्गासोबत शासनही शेतकर्याच्या पाठीशी येत असल्याचे दिसून येत नाही. अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करताना शेतकर्यांच्या नाकी नऊ येत आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकर्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
पीक लागवडीचा खर्च निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. पीक निघाल्यावर कर्जाच्या व्याजाचे पैसे देणेही शेतकर्यांना अवघड जात आहे. काही शेतकर्यांनी कर्जापोटी शेती विकल्या आहेत. (Farmer Heavy Damage) शेतकर्यांना वारंवार नापिकीचा सामना करावा लागत आहे. कधी पिकावर रोगराई येणार याची शाश्वती राहिली नाही. औषधी व फवारणीच्या खर्चात वाढ झाली आहे. रासायनिक खताचे भाव गगनाला भिडले आहेत. शेतमजूर मिळत नसल्याने शेतमजुराची मनधरणी करावी लागत आहे. अधिकची मजुरी देऊनही शेतकर्याच्या शेतात मजूर काम करायला तयार नाहीत.
वन्यप्राण्यांचा हल्ला शेतकर्यांच्या जिवावर उठला आहे. तर सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना ग्रामीण भागात होत असून त्यात शेतकरी, शेतमजूर व गुराखी जिवानिशी जात आहेत. आर्थिक परिस्थितीने घायाळ असलेल्या (Farmer Heavy Damage) शेतकरी मुलांना उच्च शिक्षण घेता येत नाही. आता हातातोंडाशी येणारे खरीप पीक निसर्गाचा पाऊस हिरावून नेणार त्यामुळे शेतकर्यांनी कर्ज फेडावे की स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करीत आहेत. मायबाप शासन प्रशासनाने यावर तोडगा काढावा अशी मनधरणी शेतकर्यांकडून केली जात आहे.