पुसद (Farmer Melava) : तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी तथा पिंपळखुटा ग्रामपंचायतचे सरपंच रणवीर पाटील यांच्या शेतामध्ये शेतकरी मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक (Indranil Naik) हे प्रामुख्याने उपस्थित होते.
जय किसान ॲग्रोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने सदर हा मेळावा (Farmer Melava) आयोजित करण्यात आला होता तर व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्त्या सौ. मोहिनी इंद्रनील नाईक, नायब तहसीलदार गजानन कदम, शिवाजी नालकर, सीईओ जय किसान ॲग्रोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर, क्रांती पाटील कामारकर, विजय जाधव, समाधान धुळधुळे तालुका कृषी अधिकारी महागाव, अशोक जाधव, बाबुसिंग आडे, भगवान आसोले, अशोक वडते, अभिजित पवार, आयुक, आबासाहेब देशमुख, शंकर राठोड, अमर कन्नावार, विजय मुकाडे तालुका कृषी अधिकारी पुसद, गजानन सुरोशे, यांच्यासह यांच्या शेतामध्ये सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला ते रणवीर पाटील इत्यादी उपस्थित होते. तर नागनाथ कांगणे व कारतूस पवार हे उपस्थित होते.
यावेळी राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक (Indranil Naik) यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले तर, इत्यादी मान्यवरांनी ही यावेळी आपली मनोगते व्यक्त केली, शेतकरी मेळाव्याला मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी बांधव सहभागी झाला होता.