महागाईच्या वरवंट्याखाली बिघडत चालले शेतकऱ्यांचे आर्थिक गणित!
-सतीश मल्लाडे
शिरूर अनंतपाळ (Farmer Production) : शेतीची मशागत महागली, खतांचे दर गगनाला भिडले, शेतमजुरांकडून होणारी असाह्य आर्थिक अडवणूक यासह अनुषंगिक घटकांचे दर शेतकऱ्यांच्या आवाक्यात राहिलेले नाहीत. दिवसागणिक वारेमाप भडकलेल्या (Farmer Production) महागाईच्या वरवंट्याखाली शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे. यंदा उन्हाळी मशागतीचा खर्च वाढला आहे. गेल्या काही वर्षांपासून शेती उत्पादनाचा खर्च वाढत चालल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
यंदा तर शेती उत्पादनात (Farmer Production) मोठी घट झाली. शिवाय उत्पादित शेतमालाला भाव नाही. वाढलेली महागाई यामध्ये शेतकरी भरडला जात आहे. शेतकऱ्याला आर्थिक खर्चाची हातमिळवनी करताना अक्षरश: दिवसा तारे दिसू लागले आहेत. वास्तविक पाहता खतांची दरवाढ साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होते. मात्र गेल्या दोन-तीन वर्षापासून मात्र कोणत्याही हंगामात अवेळी खतांच्या दरात वाढ होऊ लागली आहे. खतांच्या दरवाढीचा फटका शेती मशागतीत गुंतलेल्या शेतकऱ्यांना चांगलाच बसू लागला आहे.
जाहीर झालेल्या दरवाढीच्या आकडीवारीनुसार दरवाढीत अनेक नामवंत कंपन्या आघाडीवर आहेत. त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे सर्वाधिक मागणी असलेल्या युरिया खताच्या दरात मात्र वाढ झालेली नाही. युरियाचे दर २६६ रुपये प्रति बॅग ४५ किलो तसे कायम आहेत. युरिया खताची ५० किलोची बॅग ४५ किलो करण्यात आलेली आहे. मात्र अन्य खतांच्या दरात वाढ झाली आहे. तालुक्यातील साकोळ, अजनी, अंकुलगा, सांगवी, उजेड शिरूर अनंतपाळ आदी परिसरात उसाचे क्षेत्र (Farmer Production) आगामी हंगामासाठी जवळपास मागील वर्षीच्या तुलनेत दीडपट ऊस लागवड क्षेत्र वाढले आहे.
परिणामी ती खते शेतकऱ्यांना (Farmer Production) परवडणे अवघडच होणार आहे. मात्र यामुळे दरवाढ न झालेल्या युरिया खताच्या मागणीत वाढ होणार हे स्पष्टच आहे. आधीच परिसरासह संपूर्ण तालुक्यातील शेतकरी सातत्याने नैसर्गिक संकटाचा सामना करत आहेत. त्यातूनच त्याचे उत्पादन आणि उत्पन देखील घटले आहे. यातच भर म्हणून की काय त्याची सातत्याने शेतमजुरांकडून अडवणूक होत आहे. शेतमजुरीचे दर देखील मनमानीपणे वाढलेले आहेत. या सर्व परिस्थितीला सामोरे जाण्याखेरीज शेतकऱ्याला पर्याय राहिलेला नाही. शेतमजुरांकडून तर मोठी अडवणूक होत असल्याने, शेतकरी पेरणी अंतरमशागती यासाठी लहान ट्रॅक्टरचा वापर करतात. मात्र पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने मशागतीचे दर देखील वाढले आहेत.
शेती मशागत राहिली नाही आवाक्यात
रासायनिक खतांच्या दरात विविध कंपन्याने भरमसाठ आणि मनमानी वाढ केली आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या अर्थकारणावर निश्चितच होऊ लागला आहे. सर्वाधिक फटका हा (Farmer Production) शेती मशागतीचे दर महाग होण्यावर झाला आहे. नांगर,रोटर,सरी मारणे,पाळी मारणे,तीरी मारणे आदी मशागतीचे दर वाढल्याने शेतीची मशागत देखील शेतकऱ्यांसाठी महाग होऊ लागली आहे. परिणामी शेती पिकवणे आता अवघड होऊ लागले आहे.
मशागत आणि मजुरीचे दर आवाक्याबाहेर
नांगरणे २५००, पाळी मारणे.१०००, मोगडा.१०००, तिरी १४००, खत पेरणी १४००, रोटावेटर २२००, सरी सोडणे १२००, ट्रॅक्टर वाहतूक ८०० ते १००० रुपये असा आहे. वाढलेल्या इंधनच्या दरामुळे ट्रॅक्टरने शेती मशागत करणे अवघड झाले आहे. पण शेतकरी यांच्यापुढे पर्याय नाही. त्यामुळे सध्या बरेचसे शेतकऱ्यांकडे बैल जोडी नाही. त्यामुळे शेती मशागत कितीही दर वाढले तरी शेतकऱ्यांपुढे पर्याय नसल्याने मशागत केली जात आहे. शेती मशागत आणि मजुरांचे दर आवाक्याबाहेर गेल्याने शेती करणे खूप कठीण झाले आहे.
– धोंडीराम हजारे, शेतकरी




