परभणी तालुक्यातील शहापुर येथील घटना अकस्मात मृत्युची नोंद
परभणी (Farmer suicide Case) : पावसामुळे शेतातील पीक बरोबर आले नाही, त्यात बँकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत एका शेतकर्याने विहिरीत उडी घेतली. पाण्यात बुडून शेतकर्याचा मृत्यू झाला. ही घटना ६ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास परभणी तालुक्यातील शहापुर येथे उघडकीस आली. या (Farmer suicide Case) प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
बबन भिमाशंकर बोंबले वय ६३ वर्ष असे मयत शेतकर्याचे नाव आहे. या बाबत प्रकाश आदोडे यांनी खबर दिली आहे. बबन बोंबले यांनी शेतातील पीक पावसामुळे बरोबर आले नाही. त्यात बँकेचे कर्ज कसे फेडावे या चिंतेत शहापुर येथील एका विहिरीत उडी घेतली. पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तपास पोउपनि. तावडे करत आहेत. (Farmer suicide Case) घटनास्थळी पोनि. श्रीकांत डोंगरे, पोह. आचार्य यांनी भेट दिली.
विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह
परभणी : जिंतूर तालुक्यातील पांढरगळा शिवारात विहिरीमध्ये वीस वर्षीय तरुणाचा मृतदेह तरंगतांना आढळून आला. या (Farmer suicide Case) प्रकरणी ६ नोव्हेंबरला जिंतूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. उध्दव तुपसुंदर यांनी खबर दिली आहे. आकाश चांगदेव वाकळे वय २० वर्ष, असे मयताचे नाव आहे. प्रकरणाचा तपास पोह. कवठेकर करत आहेत.




