मार्च ते मे २०२५ या कालावधीत नुकसान झालेल्या पिकासाठी ६३२.८७ लाखांचा निधी मंजुर
गडचिरोली (Heavy Rains) : यावर्षीच्या खरीप हंगामात येत असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम संकटात सापडला असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.दरम्यान रब्बी हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले होते. रब्बी हंगामात मार्च ते मे २०२५ या कालावधीत झालेल्या (Heavy Rains) अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना नुकसानभरपाई करण्यासाठी शासनाकडून ६३२.८७ लाखांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.यामुळे रब्बी हंगामातील नुकसानग्रस्त शेतकर्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ (Heavy Rains) यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकर्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. केंद्र शासनाने विहित केलेल्या १२ नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त राज्य शासनाने दि.३० जानेवारी २०१४ अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणार्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. तसेच, दि.२२ जून २०२३ च्या शासन निर्णयान्वये (Heavy Rains) सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे.
फेब्रुवारी, २०२५ ते मे, २०२५ या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकर्यांना मदत देण्याकरिता निधी वितरीत करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. हा निधी DEऊ पोर्टलव्दारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरीत करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देतांना व्दिरुक्ती होणार नाही याची तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी. निधी खर्च करताना सर्व शासन निर्णयातील सुचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकर्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करु नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. जिल्हाधिकारी यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी असे आदेश शासनाने दिले आहेत.
जिल्ह्यातील २६४३ शेतकर्यांना मिळणार आर्थिक मदत
रब्बी हंगाम २०२५ मध्ये अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे नुकसान झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील २६४३ शेतकर्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. मार्च ते मे २०२५ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील २६४३ शेतकर्यांच्या ४०४४.२३ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते.याकरीता ६३२.८७ लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. मार्च २०२५ मध्ये अवकाळी पाऊस ,गारपिटीमुळे१५०६ शेतकर्यांच्या ७४९.६३ हेक्टर क्षेत्रातील पिके बाधीत झाली होती. याकरीता नुकसानभरपाई म्हणुन १२७.४३ लाखांचा निधी मंजुर करण्यात आला.एप्रिल २०२५ मध्ये ७९९ शेतकर्यांच्या ३९५.७ हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला. याकरीता६७.१७ लाखांचा निधी मंजुर करण्यात आला तसेच मे २०२५ मध्ये (Heavy Rains) अवकाळी पावसाने ५३३८ शेतकर्यांच्या २८९९.२३ हेक्टर क्षेत्रातील पिकास फटका बसला होता. या अंतर्गत ४३८.२७ लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.




 
			 
		

