मुख्यमंत्री फडणवीस यांची ‘वज्रमूठ सर्व सामाजिक संघटनांची’ शिष्टमंडळाला ग्वाही!
मुंबई (Farmers Loan Waiver) : शेतकऱ्यांची एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ केली जाईल, तसेच पुढील 10 वर्षांत शेतकऱ्यांना सक्षम करणारे आर्थिक धोरण राबवले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली. ‘वज्रमूठ – सर्व सामाजिक संघटना’ (Vajramuth – All Social Organizations) यांच्यावतीने बुधवारी (दि.30) सह्याद्री अतिथी गृहात अ.भा. छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने (Delegation) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील विविध प्रश्नावर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले. तसेच अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने नवीन महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
बैठकीवेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन उपस्थित!
राज्यातील वाढत्या अन्याय, अत्याचार, सामाजिक असंतोष, शेतकरी आणि घटनात्मक मूल्यमापनाच्या पार्श्वभूमीवर ‘वज्रमूठ–सर्व महाराष्ट्रातील सामाजिक संघटना’ या व्यासपीठाच्यावतीने ही सविस्तर चर्चा झाली. या बैठकीवेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते. यावेळी राज्यभरातून आलेल्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे आपल्या मागण्यांचा प्रस्ताव ठेवला.
जनतेच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी सरकार सकारात्मक!
ज्या प्रकरणांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे, त्यातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल. तसे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना (Police officers) स्पष्ट निर्देश देण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांची एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ केली जाईल. तसेच पुढील दहा वर्षांत शेतकऱ्यांना सक्षम करणारे आर्थिक धोरण सरकार राबवील. क्रांतीसूर्य स्व.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने नवीन महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. रमी खेळणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर योग्य ती कारवाई होईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिली. ही बैठक संघर्ष नव्हे, तर संवादासाठी होती आणि त्यातून जनतेच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी सरकार (Govt) सकारात्मक आहे, असा विश्वास फडवणीस यांनी दिला
आश्वासन पाळा, अन्यथा आंदोलने!
वज्रमूठ व्यासपीठ सरकारला पुढील काळात जनतेचा आवाज पोचवण्याचे कार्य करत राहील, मात्र जर दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण झाली नाही तर घटनात्मक चौकटीत आंदोलन स्वरूपात सर्व संघटना पुन्हा एकत्र येतील याचा पुनरुच्चारही यावेळी करण्यात आला.
शिष्टमंडळात यांचा होता समावेश!
यावेळी या शिष्टमंडळात अखिल भारतीय छावा संघटनेचे (All India Umbrella Organisation) केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष माधवराव देवसरकर, मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, राधेश्याम पवळ, दशरथ कपाटे, अविनाश कदम, सुनील कदम, सुभाष कोल्हे, दिलीप गवळी, मनीष तिवडे, योगेश पाटील, राजेश चव्हाण, विशाल देवणे, उत्तम बिराजदार, मनोज पाटील, मच्छिंद्र चिंचोले, साई पाटील, शंकर जाधव आदींसह शिष्टमंडळात महाराष्ट्रातील पदाधिकारी (Office Bearer) उपस्थित होते.