वसमत (Farmers March) : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी वसमत येथे गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत मोर्चा काढण्यात आला तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन (Farmers March) करुन मागणीचे निवेदन देण्यात आले शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग वसमत तालुक्यातील गिरगाव, पळसगाव तर्फे माळवटा ,गुंज तर्फे आसेगाव, सावरगाव ,आसेगाव, टाकळगाव ,राजापूर, बाभूळगाव, पिंपळाचौरे, लोन बुद्रुक ,हयात नगर, जवळा खुर्द, जवळा बुद्रुक या गावातून जात आहे. यामुळे (Farmers March) शेतकऱ्यांच्या जमिनी या मार्गात आहेत त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे हा मार्ग रद्द करावा अशी मागणी होत आहे.
गुरुवारी वसमत येथे (Farmers March) शेतकऱ्यांनी मोर्चा काढून मागणीचे निवेदन दिले व तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. वसमत येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात तहसील कार्यालयात मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी दिले आहे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावरॲड केतन सारंग यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देण्यासाठी विविध भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.