राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प
संपादीत जमिनीच्या मोबदल्याची केली मागणी
परभणी/सेलू (Parbhani rasta Roko Andolan) : देवगाव फाटा या राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी या रस्त्यावरील चिकलठाणा पाटी येथे शेतकर्यांनी सोमवार २१ एप्रिल रोजी सुमारे तीन तास रस्ता रोको आंदोलन केले. तहसिलदार डॉ.शिवाजी मगर यांच्या मध्यस्थीनंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. दर निश्चिती समितीच्या मंजूर प्रपत्र १ प्रमाणे तात्काळ मोबदला देण्यात यावा.
या प्रमुख मागणीसाठी जालना- परभणी- नांदेड या समृद्धी महामार्ग प्रकल्पातील बाधित शेतकर्यांनी सेलू – देवगाव फाटा या राष्ट्रीय महामार्गावरील चिकलठाणा पाटीवर सोमवार २१ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजल्यापासून बैलगाड्यासह जोरदार (Parbhani rasta Roko Andolan) रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे सेलू -देवगाव फाटा रस्त्यावरील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प झाली होती. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनकर्ते शेतकरी रामेश्वर गाडेकर, रमेश माने, प्रशांत नाईक, रघुनाथ टाके, विजय खरात, पप्पू गाडेकर,सुंदर गाडेकर, निशांत मुंडे, सुनील लिपने, सोनू खरात यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग बाधित नऊ गावातील शेतकरी महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
जालना परभणी नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पामध्ये शेतकर्यांच्या जमिनी संपादित होत असून शेतकर्यांना पुरेसा मावेजा मिळत नसल्याने शेतकर्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. याप्रकरणी शेतकर्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. हे (Parbhani rasta Roko Andolan) प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत प्रशासनाने भूसंपादन बाबत कुठलाही निर्णय घेऊ नये, अशी मागणी आंदोलन करणार्या शेतकर्यांनी यावेळी केली आहे. यावेळी तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांना निवेदन देण्यात आले.
४ ऑक्टोंबर २०२४ रोजी दर निश्चिती समितीची जिल्हास्तरीय बैठक झाली होती. त्यामध्ये प्रपत्र १ ला समितीने मंजुरी दिलेली आहे. तसेच उच्च न्यायालयात दाखल याचिका क्रमांक ३२२९/२०२५ मधील २४ मार्च २०२५ चे आदेश दिलेले असताना देखील अद्याप पर्यंत मावेजा वाटप केलेला नाही. या होणार्या विलंबामुळे आम्हा सर्व बाधित शेतकर्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. (Parbhani rasta Roko Andolan) त्यामुळे मंजूर प्रपत्र १ प्रमाणे तात्काळ मोबदला देण्यात यावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्या शेतकर्यांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सुमारे तीन तास चाललेले रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सेलू – देवगाव फाटा या राष्ट्रीय महामार्गावरील चिकलठाणा पाटी येथे शेतकर्यांनी संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी सुमारे ३ तास वाहतूक ठप्प करून आंदोलन केले. मात्र यावेळी या (Parbhani rasta Roko Andolan) रस्त्याने आलेल्या रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून देऊन आपल्या माणुसकीचे दर्शन घडवले आहे.