औराद बाजार समिती

औराद बाजार समितीत नव्या मुगाची पहिली आवक; ७७५१ रुपये प्रति क्विंटलचा दर

Aurad Market Committee:

औराद बाजार समितीत नव्या मुगाची पहिली आवक; ७७५१ रुपये प्रति क्विंटलचा दर

Aurad Market Committee

औराद शहाजानी (Aurad Market Committee) : कृषी उत्पन्न बाजार समिती, औराद शहाजानी येथील मार्केट यार्डमध्ये चालू खरीप हंगामातील नव्या मुगाची पहिली आवक झाली. कर्नाटक राज्यातील बसवकल्याण तालुक्यातील कादेपूर येथील शेतकरी प्रकाश जमादार यांनी सहा पोती नव्या पोपटी मुगाची बाजार समितीत विक्रीसाठी आणली.

सार्थक ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर अनिल देवणे यांच्या आडतीवर हा शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला. बाजार समितीच्या संचालक मंडळाने बाजार समितीत हंगामातील पहिला नवीन शेतीमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्याचा यथोचित सत्कार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ज्येष्ठ व्यापारी प्रकाश अप्पा टेंकाळे यांनी बाजार समितीच्या वतीने शेतकरी प्रकाश जमादार यांचा सत्कार केला.

तसेच ज्या आडतीवर हा नवीन मुग दाखल झाला त्या सार्थक ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर अनिल देवणे यांचाही बाजार समितीच्या वतीने दीपक थेटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नव्या मुगाची पहिली खरेदी करणारे व्यापारी संजय आगरे यांचाही यावेळी बाजार समितीतर्फे सत्कार करण्यात आला. पावसाअभावी मुगाचे दाणे अपेक्षेपेक्षा लहान आकाराचे असून माल काही प्रमाणात कच्चा असल्याने त्यास ७७५१ रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. व्यापारी संजय आगरे यांनी हा मुग खरेदी केला.

यावेळी बाजार समितीचे संचालक  सतीश देवणे,संचालक  राहुल सूर्यवंशी, बाजार समितीचे सचिव सतीश मरगणे,  बालाजी थेटे,  दिपक थेटे ,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, ज्येष्ठ व्यापारी शिवपुत्र धबाले, पुनम राठी, रमेश मणियार, सदानंद धबाले, जीवन शिंदे, माधव बिरादार, घनश्याम राठी, आनंद राठी, विनोद सोनी, देवाप्पा देशमुख, संजय बियाणी, शालिवान शिंदे, सुनील कालगणे, शालिवान मदनुरे, दत्तु बिरादार, संजीव सगर, ज्ञानेश्वर खरगे यांच्यासह व्यापारी, शेतकरी व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.