चाकूर पशुपालक

चाकूरात पशुपालकांचा उस्फूर्त प्रतिसाद; प्रशिक्षणासाठी ४००हून अधिकांची गर्दी

Chakur Livestock Farmer: प्रशिक्षणासाठी ३७३ जणांची अधिकृत नोंदणी झाली असून, नोंदणीची प्रक्रिया सुरूच होती. प्रत्यक्षात मात्र ४०० हून अधिक पशुपालक उपस्थित झाल्याने पंचायत समितीचे सभागृह अपुरे

चाकूरात पशुपालकांचा उस्फूर्त प्रतिसाद; प्रशिक्षणासाठी ४००हून अधिकांची गर्दी

Chakur Livestock Farmer

 

दुष्काळाच्या छायेत जोडधंद्याची आस; ₹२०० नोंदणी शुल्कावरही उमटली नाराजी

चाकूर (Chakur Livestock Farmer) : जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, लातूर तसेच तालुका पशुसंवर्धन अधिकारी, चाकूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती, चाकूरच्या सभागृहात दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन विषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील पशुपालक आणि शेतकऱ्यांकडून या प्रशिक्षणाला अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाला. प्रशिक्षणासाठी ३७३ जणांची अधिकृत नोंदणी झाली असून, नोंदणीची प्रक्रिया सुरूच होती. प्रत्यक्षात मात्र ४०० हून अधिक पशुपालक उपस्थित झाल्याने पंचायत समितीचे सभागृह अपुरे पडले आणि संबंधित विभागाची चांगलीच धावपळ उडाली.

यंदा अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम अडचणीत आला आहे. अनेक भागांत पेरण्या खोळंबल्या असून, झालेल्या पेरण्यांनाही पावसाअभावी फटका बसत आहे. अशा परिस्थितीत शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, शेळीपालन आणि कुक्कुटपालनाकडे अनेक शेतकरी आशेने पाहत आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच आधुनिक पद्धतीचे मार्गदर्शन मिळावे, या अपेक्षेने मोठ्या संख्येने पशुपालक प्रशिक्षणासाठी दाखल झाले.

मात्र या प्रशिक्षणासाठी प्रति प्रशिक्षणार्थी ₹२०० नोंदणी शुल्क आकारण्यात आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी व पशुपालकांना प्रशिक्षणासाठी शुल्क भरावे लागत असल्याची खंत उपस्थितांनी बोलून दाखवली. "शेतीतून उत्पन्न नाही, पाऊस नाही, पेरण्या अडल्या आहेत. अशा वेळी जोडधंदा शिकण्यासाठीही शुल्क भरावे लागत असेल तर पुढे योजना मिळविताना आणखी किती खर्च करावा लागेल?" असा प्रश्न अनेक प्रशिक्षणार्थींनी उपस्थित केला.

प्रशिक्षणासाठी (Chakur Livestock Farmer) अनपेक्षित गर्दी झाल्याने  अनेकांना उभ्यानेच कार्यक्रम ऐकावा लागला, तर काहींना सभागृहाबाहेर थांबावे लागले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून आधुनिक दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, पशुखाद्य व्यवस्थापन, रोगप्रतिबंधक उपाययोजना, शासकीय योजना आणि उत्पन्नवाढीचे विविध पर्याय याविषयी माहिती देण्यात येणार आहे. शेतीवरील वाढते संकट लक्षात घेता अशा प्रशिक्षणांची गरज असल्याचे पशुपालकांनी मान्य केले. मात्र भविष्यात अशा कार्यक्रमांचे नियोजन अधिक मोठ्या ठिकाणी करावे आणि आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी व पशुपालकांसाठी नोंदणी शुल्क माफ किंवा अत्यल्प ठेवावे, अशी मागणीही यावेळी जोर धरू लागली.

दुष्काळाच्या छायेत शेतीला पर्याय शोधणाऱ्या पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रशिक्षणाला लाभला असला, तरी वाढती गर्दी आणि नोंदणी शुल्काचा मुद्दा हा चर्चेचा प्रमुख विषय ठरला. योग्य नियोजन आणि सुलभ प्रशिक्षण व्यवस्था केल्यास अशा उपक्रमांचा लाभ आणखी मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील पशुपालकांना मिळू शकतो.

संबंधित सामग्री

विविध विभागांच्या प्रलंबित प्रकरणाचा सीईओ विवेक गायकवाड यांच्याकडून आढावा

विविध विभागांच्या प्रलंबित प्रकरणाचा सीईओ विवेक गायकवाड यांच्याकडून आढावा

Hingoli Water Scarcity Plan: जिल्हा परिषदेच्या सभागृहात ५ ऑक्टोबर सोमवार रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.बैठकीच्या प्रारंभी २ ऑक्टोबर रोजी घेण्यात आले

Oct 05, 2026
उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

Risod Taluka Water Scarcity: उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने रिसोड तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत

Oct 04, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सव साधेपणाने साजरे करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्याचं आवाहन केलं.

Oct 01, 2026
महाराष्ट्रात पाणीटंचाईचा धोका! भूजल पाणीउपशावर बंदीचे निर्देश

महाराष्ट्रात पाणीटंचाईचा धोका! भूजल पाणीउपशावर बंदीचे निर्देश

Maharashtra Water Scarcity: राज्यातील अनेक भागांत अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने पाणीटंचाईचे गंभीर सावट निर्माण झाले आहे. संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील भूजल उपशावर निर्बंध

Sep 20, 2026
पालकमंत्र्यांनी मदत जाहीर करूनच जिल्ह्याची सीमा ओलांडावी; परिवर्तन शेतकरी संघटनेची मागणी

पालकमंत्र्यांनी मदत जाहीर करूनच जिल्ह्याची सीमा ओलांडावी; परिवर्तन शेतकरी संघटनेची मागणी

मानोरा तालुक्यात पावसाच्या खंडामुळे पिकांचे नुकसान; वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी मदत देण्याची मागणी.

Sep 19, 2026