दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठी आर्थिक हानी
औंढा नागनाथ (Small Farmers Crisis) : तालुक्यातील पिंपळदरी येथील भूधारक शेतकऱ्यांच्या नऊ शेळ्या अचानक एका दहा मिनिटात दगावल्याने मोठी आर्थिक हानी झाली असून सदर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अवघ्या दहा मिनिटात होत्याचे नव्हते झाले असून शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली असून सदर शेतकऱ्याला शासनाने तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांसह गावकऱ्यांकडूनही होत आहे.
पिंपळदरी येथील अल्पभूधारक शेतकरी सूर्यकांत रिठ्ठे यांना सो मालकीची एक एकर शेती असून दर शेतीवर उपजीविका करीत असतानाच शेती वर उदरनिर्वाह पूर्ण होत नसल्याने त्यांनी जोडधंदा म्हणून शेळी पालन व्यवसाय सुरू केला होता. मागील पाच वर्षापासून ते शेळी पालन व्यवसायाशी निगडित व्यवसाय करत होते शेळी पालन करून मोठे झाल्याच्या नंतर शेळी करडे विकून आपला उदरनिर्वाह कसा बसा चालवत होते. त्यांना दरवर्षी या शेळीपालनातून काही उत्पन्न मिळत होते. दरम्यान त्यांच्याकडे एकूण 23 शेळ्या संगोपनासाठी होत्या. त्यांनी काल दिनांक रोजी पिंपळदरी परिसरात शेळ्या चारल्यानंतर त्यांना पाणी पाजले. मात्र अवघ्या दहा मिनिटात त्यापैकी नऊ शेळ्या दगावल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
यामध्ये त्यांचे सुमारे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले ऑइल दुष्काळी परिस्थितीत हे दुसरे मोठे संकट आल्याने शेतकरी रिठ्ठे हे मोठे अडचणीत सापडले आहेत. या परिस्थितीमुळे आता दुष्काळी परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. (Small Farmers Crisis) आता पत्नीसह तीन मुलांना सोबत घेऊन बाहेर जिल्ह्यात कामाला कामाच्या शोधात भटकंती करण्याची वेळ त्यांच्यावर आली. असल्याची क्रिया सदर शेतकऱ्याने दिली असून शासनाने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांचा शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.