सोयाबीनची पिके नुकसान

सोयाबीनची पिके वाळली; सेवादास नगर पंचक्रोशीतील खरीप हंगाम गेला वाया! 

Soybean Crops Damage: तालुक्यातील सेवादास नगर, वरोली भागामध्ये पावसाने दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून दडी मारल्याने सोयाबीन, कपाशी, तूर इत्यादी पिके पूर्णपणे नष्ट झाली असून या प्रचंड नुकसान

सोयाबीनची पिके वाळली; सेवादास नगर पंचक्रोशीतील खरीप हंगाम गेला वाया! 

Soybean Crops Damage

 

दीड महिन्यापासून पावसाने डोळे वटारले; दुबार पेरणीचा खर्चही पाण्यात, शेतकरी हवालदिल! 

मानोरा (Soybean Crops Damage) : तालुक्यातील सेवादास नगर, वरोली भागामध्ये पावसाने दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून दडी मारल्याने सोयाबीन, कपाशी, तूर इत्यादी पिके पूर्णपणे नष्ट झाली असून या प्रचंड नुकसानीने सेवादास नगर व आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांचे वार्षिक अर्थचक्र पूर्णपणे बिघडले आहे. त्यामुळे सेवादासनगर महसूल मंडळात कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाईसह पिक विमाचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा, असे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांना आज पाठविले आहे. 

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने, कर्ज काढून आणलेले महागडे सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणात बनावट / उगवण क्षमताहीन निघाल्याने शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा पेरणी करावी लागली होती. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना दुप्पट खर्च सहन करावा लागला आहे. दुसऱ्यांदा पेरणी करून कसेबसे वर आलेले सोयाबीन दीड महिन्याचे झाल्यानंतर पुढील दीड महिना पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. सध्या सेवादास नगर, वरोली, कारखेडा, विठोली, बेलोरा, सोयजना, चिखली, देवूरवाडी, धानोरा, गादेगाव या भागातील सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाळून गेले आहे. शेतात उभे पीक जळाल्यासारखे दिसत असून कापूस आणि तूर पिकांचीही तीच अवस्था आहे.

खरीप हंगाम हाच शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या अर्थकारणाचा कणा असतो. हंगाम वाया गेल्याने पुढील वर्षाचे नियोजन, मुलांचे शिक्षण, बँकेचे कर्ज, सावकाराचे देणे कसे फेडायचे?  या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून सेवादास नगर महसूल मंडळात कोरडा दुष्काळ जाहीर करावा. बनावट बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत.

दुबार पेरणी आणि वाया गेलेल्या खरीपासाठी हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी. प्रशासनाने तात्काळ शेतात येऊन पाहणी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सेवादास नगर पंचक्रोशीतील नेमीचंद बिहारी राठोड, धनराज मोहन पवार, मंगल परशुराम राठोड, संजय जोगाराम राठोड, सतीश दादाराव पवार, दुर्गादास देवीसिंग राठोड, शंकर मोहन पवार, हिम्मत उत्तम पवार, प्रवीण मोहन पवार, अरुण लक्ष्मण पवार, शामराव नरसिंग जाधव या शेतकऱ्यांनी दिला आहे.

टैग्स: Soybean Crops Damage