हिंगोली चारा वाहतूक बंदी

हिंगोलीत चारा, गवत व वैरण जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे आदेश

Hingoli Fodder Transport Ban: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील उपलब्ध हिरवा व वाळलेला चारा, गवत व वैरण जिल्ह्याबाहेर विक्री व वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे-जिल्हा प्रशासन

हिंगोलीत चारा, गवत व वैरण जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे आदेश

Hingoli Fodder Transport Ban

हिंगोली (Hingoli Fodder Transport Ban) : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील उपलब्ध हिरवा व वाळलेला चारा, गवत व वैरण जिल्ह्याबाहेर विक्री व वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र वैरण (निर्यात नियंत्रक) आदेश, २००१ मधील तरतुदीनुसार हे आदेश दिले आहेत. ही बंदी ५ ऑक्टोबर २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.

सन २०२६ च्या खरीप हंगामात हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, वसमत आणि औंढा नागनाथ या पाचही तालुक्यांत ट्रिगर-१ (प्रथम कळ) लागू झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अल्प पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून चारा उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी भविष्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात उपलब्ध चारा जिल्ह्याबाहेर जाऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या (Hingoli Fodder Transport Ban) आदेशानुसार जिल्ह्यात उपलब्ध हिरवा व वाळलेला चारा, गवत व वैरण यांची जिल्ह्याबाहेर विक्री तसेच वाहतूक करता येणार नाही. संबंधित यंत्रणांनी आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.