सोयाबीन होळी आंदोलन

सरसकट ५० हजारांच्या मदतीसाठी सोयाबीन व शासन निर्णय होळी

Soybeans Holi Andolan: शेतात करपलेले सोयाबीन बोंड्या विना वाळलेली पराटी (कापसाचे झाड) पाण्याविना फळधारणा न झालेल्या मुंग व उडीद,तूर या भयान अवस्थेत कर्जबजारी झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून फुटी कवडी..

सरसकट ५० हजारांच्या मदतीसाठी सोयाबीन व शासन निर्णय होळी

Soybeans Holi Andolan

 

वसंतराव नाईक यांचे शिक्षण झालेल्या गावातून आंदोलन पेटले

मानोरा (Soybeans Holi Andolan) : शेतात करपलेले सोयाबीन बोंड्या विना वाळलेली पराटी (कापसाचे झाड) पाण्याविना फळधारणा न झालेल्या मुंग व उडीद,तूर या भयान अवस्थेत कर्जबजारी झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून फुटी कवडीचीही मदतीची घोषणा न झाल्याने कोरड्या दुष्काळाची मदत न मिळाल्याने शासनाने काढलेल्या आश्वासनाच्या जीआरची व करपलेल्या सोयाबीनची दि. ५ ऑक्टोबर रोजी विठोली येथील चौकात होळी जाळून शेतकऱ्यानी संताप व्यक्त केला.

परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने मागील महिन्याभरापासून सतत निवेदन स्मरणपत्र देत शेतकऱ्याचा पोळा तहसीलवर भरून सरसकट हक्‍टरी ५० हजार रुपयाची मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी यासाठी सातत्याने पाठपुरावा चालविला परंतु शासनाने दखल न घेतल्यामुळे आता गावागावातून शासनाची होळी पेटवून हा लढा अधिक तीव्र करणार असल्याचे शेतकरी नेते मनोहर राठोड विठोली येथील होळी आंदोलनात जाळलेल्या (Soybeans Holi Andolan) सोयाबीनची व्यथा शासनाला कळावी या हेतूने हे आंदोलन उभारले असून या आंदोलनात आता शेतकरीही उतरले आहेत.

आंदोलन (Soybeans Holi Andolan) ठिकाणी नायब तहसीलदार आस्टूरे यांनी निवेदन स्वीकारले यावेळी पोलिसांचा बंदोबस्त होता ठाणेदार नयना पोहेकर यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. यावेळी उपसरपंच जगदीश बारसे, माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष विशाल ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष देवा बारसे, निलेश पाटील, माजी सरपंच रामराव चव्हाण, नितीन इंगोले, दामोदर मांजरे, सुरेश ढोले, गजानन गावंडे,मुगसिराम पाटील, उमेश महल्ले आदीसह शेकडो शेतकऱ्यांनी (Soybeans Holi Andolan) सोयाबीन जाळून आपला रोष व्यक्त केला.आंदोलन स्थळी शिक्षक नेते एल टी मनवर सर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
 
यावेळी (Soybeans Holi Andolan) आंदोलन स्थळी दिलेल्या निवेदनात १९७२ दुष्काळात माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक साहेबांनी त्या भीषण दुष्काळातही शेतकरी, शेतमजूर, जनावर व जनमाणसाला आर्थिक मदत देत धीर देऊन दुष्काळात जनतेला सावरले आता शासनाने हे सर्वेचा सोंग बंद करून नाईक साहेबांच्या सारखी भुमिका घेवून आता दुष्काळात होरपडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट हेक्‍टरी ५० हजार रुपयाची मदत जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन आता थांबणार नाही. गावा - गावात तालुकाभर आंदोलन पेटवत परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने हजारो शेतकऱ्यांनह येणाऱ्या १४ ऑक्टोंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक मानोरा येथे शेतकरी परिषद घेऊन उग्र स्वरूपाचे आंदोलन उभारणार असल्याचे परिवर्तन शेतकरी संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे.

टैग्स: Soybeans Holi Andolan