मानोरा पिक नुकसान

वन्य प्राण्यांनी केलेल्या पिक नुकसानीची भरपाई द्यावी!

Manora Crop Damage: मौजे चिस्तळा शिवारातील शेतकऱ्यांनी सोयाबीन तूर पिकांना रानडुक्करांच्या कळपाने नुकसान झाले. २ लाख ४५ हजारांची भरपाई मागणी करून पंचनामा देण्यात आला.

वन्य प्राण्यांनी केलेल्या पिक नुकसानीची भरपाई द्यावी!

Manora Crop Damage

मानोरा (Manora Crop Damage) : तालुक्यातील मौजे चिस्तळा शिवारात पेरणी केलेल्या ३ शेतकऱ्यांच्या सहा एकर शेतीमधील सोयाबीन व तूर पिकांचे रान डुकरांच्या कळपाने नुकसान केले असुन पिकांची पाहणी व पंचनामा करून शासनाची नुकसान भरपाई द्यावी, असे तहसीलदार राजेंद्र पाटील यांना निवेदन दि. ९ जुलै रोजी नुकसानग्रस्त बाधीत शेतकऱ्यांच्यावतीने देण्यात आले आहे. 

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मौजे चिस्तळा शिवारातील शेतकरी पीयूष अरुण राठोड, शुभम अरुण राठोड यांच्या शेत सर्व्हे नंबर २१/१,  २१/२ व सुयेश सुनील हनुमंते आणि शेत सर्व्हे नंबर २१/१ अ यांचे शेतात दि. ७ जुलै रोजी सोयाबीन आणि तूरची खरिपाची पेरणी करण्यात आली आहे. शेतात पेरणी (Manora Crop Damage) केलेले पिकाची पाहणी करण्याकरिता दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सुमारास शेतात शेतकरी गेले असता रानडुक्कराने पेरलेले पूर्ण पिक उध्वस्त केले असल्याचे दिसून आले.

यामध्ये शेतकऱ्यांचे २ लक्ष ४५ हजाराचे नुकसान झाले असल्याने पंचनामा करून मोबदला देण्याची मागणी बाधीत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली असून. निवेदन देतेवेळी अरुण राठोड, हनुमंते व चव्हाण उपस्थित होते.

संबंधित सामग्री

कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

Kurunda Farmers' Protest: भारतीय स्टेट बँक  शाखेच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, सातत्याने होणाऱ्या पिळवणूक व हेळसांडीला कंटाळून ७ ऑक्टोबर बुधवार रोजी संतप्त शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखा.

Oct 07, 2026
परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Parbhani Railway Farmers Protest: चुडावा-मरसुळ रेल्वे बायपाससाठी प्रस्तावित मार्गाची स्थळपाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे व अधिकार्‍यांना बरबडी, आडगाव व गौर येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Sep 29, 2026
घोषणांचा पाऊस नको, अंमलबजावणी कधी? ते सांगा!

घोषणांचा पाऊस नको, अंमलबजावणी कधी? ते सांगा!

औसा तालुक्यातील तावशी (ताड) येथे आदित्य ठाकरेंनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

Sep 27, 2026
दुष्काळी पाहणी दौऱ्यावर फडणवीस; ‘मागच्या 31,628 कोटींच्या पॅकेजचं काय झालं?’ वडेट्टीवारांचा फडणवीसांना थेट प्रश्न

दुष्काळी पाहणी दौऱ्यावर फडणवीस; ‘मागच्या 31,628 कोटींच्या पॅकेजचं काय झालं?’ वडेट्टीवारांचा फडणवीसांना थेट प्रश्न

फडणवीसांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यादरम्यान विजय वडेट्टीवारांनी 31,628 कोटींच्या पॅकेजवर सवाल करत शेतकऱ्यांना किमान 50 हजारांची मदत देण्याची मागणी केली.

Sep 23, 2026