शेतकरी कर्जमाफी आंदोलन

सरसकट कर्जमाफीसाठी गोरेगावात शेतकऱ्यांचा संताप; मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

Farmers' Loan Waiver Andolan: शेतकरी सहभागी, मांत्रिक पुतळ्यांचे दहन करून शासनाला मागण्या मांडले गोरेगावात जिल्ह्याच्या मुख्यालयात कर्जमाफीच्या तत्काळ रद्द करण्यासाठी आंदोलन वाढवले

सरसकट कर्जमाफीसाठी गोरेगावात शेतकऱ्यांचा संताप; मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

Farmers' Loan Waiver Andolan

गोरेगाव/ हिंगोली (Farmers' Loan Waiver Andolan) : कर्जमाफीच्या जीआरमधील जाचक अटी रद्द करून सरसकट व विनाअट कर्जमाफीच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे सोमवार १६ जून रोजी शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. शासनाच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त करत आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्याचे दहन केले. 

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोरेगावातील हे आंदोलन करण्यात आले. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या जीआरमधील अटी तात्काळ रद्द कराव्यात आणि सर्व शेतकऱ्यांना कोणतीही अट न ठेवता कर्जमाफी द्यावी, ही आंदोलकांची प्रमुख मागणी होती. 

यावेळी 'एक रुपयात पीक विमा' योजना पूर्ववत सुरू करावी आणि शेतकऱ्यांना तातडीने न्याय द्यावा, अशा (Farmers' Loan Waiver Andolan) घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे, नामदेव पतंगे, सतीश इढोळे, प्रवीण मते, मनोहर सावके यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. 

राज्य सरकारने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन सरसकट कर्जमाफीचा निर्णय जाहीर करावा, अन्यथा राज्यभरातील आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी यावेळी दिला.

संबंधित सामग्री

कर्जमुक्ती करा, शेतकऱ्यांचा अंत बघू नका; कणखर यांचा सरकारला इशारा

कर्जमुक्ती करा, शेतकऱ्यांचा अंत बघू नका; कणखर यांचा सरकारला इशारा

Farmers' Loan Waiver Andolan: रविकांत तुपकर यांचा बेमुदत अन्नत्याग आंदोलन शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला. कणखर सरकारने दबाव देण्याचा इशारा देत असून करजीमुक्ती, हक्कांचे पीकविमा

Jun 16, 2026
मुदखेड तालुक्यात शेतकऱ्यांचा एल्गार; गाढवांसह तहसीलवर धडकला मोर्चा

मुदखेड तालुक्यात शेतकऱ्यांचा एल्गार; गाढवांसह तहसीलवर धडकला मोर्चा

Mudkhed Farmer Elgar Morcha: मुदखेड तालुक्यात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोठ्या शेकडो संख्येने एल्गार मोर्चा करून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर टीका केली. डिझेल टंचाई, खत लिंकिंग, पीक विमा अडथळे

Jun 02, 2026