किसान फार्मर आयडी

परभणीत फार्मर आयडी प्रलंबित; अर्जदाराचा तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

Kisan Farmer Id: परभणीत फार्मर आयडी प्रलंबित राहिल्याने त्रस्त शेतकरी दत्ता रामराव घाडगे यांनी तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. घटनेनंतर

परभणीत फार्मर आयडी प्रलंबित; अर्जदाराचा तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

Kisan Farmer Id

परभणी (Kisan Farmer Id) :  पाथरी फार्मर आयडी ऑनलाईन अर्ज प्रलंबित राहिल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवार २७ एप्रिल रोजी दुपारी सुमारे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास घडली.

दत्ता रामराव घाडगे (रा. पाथरगव्हाण ता. पाथरी) यांनी शेतकरी ओळख क्रमांक ( फार्मर आयडी ) मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. सदर अर्ज तलाठी स्तरावर मंजूर झाला असला तरी पुढील स्तरावर तहसील कार्यालयात प्रलंबित असल्याने त्यांना अद्याप शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त झाला नव्हता. याबाबत त्यांनी अनेकदा तहसील कार्यालयात पाठपुरावा केला. मात्र संबंधित अधिकारी अनुपस्थित राहणे किंवा जबाबदारी टाळली जाणे यामुळे त्यांचे काम दीर्घकाळ प्रलंबित राहिले. यामुळे मानसिक ताण वाढल्याने घाडगे यांनी सोमवारी तहसीलदारांना लेखी निवेदन दिले होते. या निवेदनात शेतकरी ओळख क्रमांक अभावी शेतीची कामे ठप्प होत असून आर्थिक व मानसिक अडचणी निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले होते.

निवेदन दिल्यानंतर काही वेळातच घाडगे यांनी तहसील कार्यालयासमोरील प्रांगणात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित नागरिक व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्यांच्या हातातील पेट्रोलचा कॅन व आगपेटी हिसकावून घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेत अर्जदारास लेखी आश्वासन देत त्यांचा शेतकरी ओळख क्रमांक लवकरात लवकर देण्यात येईल असे सांगितले. या (Kisan Farmer Id) घटनेमुळे तहसील कार्यालयातील कारभाराबाबत संताप व्यक्त होत असून प्रशासकीय दिरंगाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

संबंधित सामग्री

कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

Kurunda Farmers' Protest: भारतीय स्टेट बँक  शाखेच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, सातत्याने होणाऱ्या पिळवणूक व हेळसांडीला कंटाळून ७ ऑक्टोबर बुधवार रोजी संतप्त शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखा.

Oct 07, 2026
परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026