दापुरा शेतकरी कर्ज नकार

दापुरा बु येथील एसबीआय बँक शाखेचा शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ

Dapura farmers loan Rejection: मानोरा तालुक्यातील दापुरा बु येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील शाखाधिकारी व वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा गंभीर आरोप

दापुरा बु येथील एसबीआय बँक शाखेचा शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ

Dapura farmers loan Rejection

 

माजी पं.स. सदस्य मधुसुदन राठोड यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मानोरा (Dapura farmers loan Rejection) : मानोरा तालुक्यातील दापुरा बु येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील शाखाधिकारी व वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा गंभीर आरोप माजी पंचायत समिती सदस्य मधुसुदन गोपीचंद राठोड यांनी केला असुन या संदर्भात त्यांनी दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
   
निवेदनात म्हटले आहे की, दापुरा बु येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी व वरिष्ठ अधिकारी हे शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. ज्या काही शेतकऱ्यांचे महिंद्रा होम फायनान्सचे सेटल झालेले आहे त्या शेतकऱ्यांना कोणतेही कर्ज नसताना देखील बँकेचे कर्मचारी त्यांना कर्ज देण्यास नकार देत आहे. 

विशेषता शेतकऱ्यांच्या शेतीवर कोणतेच कर्ज नसून तरी दापुरा येथील स्टेट बँक ऑफ इंडियातील शाखाधिकारी व वरिष्ठ अधिकारी हे जाणूनबुजून त्रास देत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील ६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून ती परिस्थिती मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांवर येऊ नये करीता आज रोजी शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे,  तरी शाखाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कर्ज देण्यात यावे असे आदेशीत करावे अन्यथा शेतकऱ्यांना तीव्र आंदोलन छेडावे लागेल तसेच एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास सर्व जबाबदारी शासनाची राहील करीता आपण या प्रश्नाकडे त्वरित लक्ष घालून न्याय द्यावा. असे निवेदन दिले आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पाठविल्याचे निवेदनात नमूद केले.