रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती

विदर्भातील नवे ‘हळद हब’आठवड्याला १० हजार क्विंटलची आवक; प्रति क्विंटल मिळाला १७ हजार रुपयांपर्यंत भाव

Risod Bazar Samiti: जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळख निर्माण केलेल्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा हळदीची विक्रमी आवक

विदर्भातील नवे ‘हळद हब’आठवड्याला १० हजार क्विंटलची आवक; प्रति क्विंटल मिळाला १७ हजार रुपयांपर्यंत भाव

Risod Bazar Samiti

रिसोड (Risod Bazar Samiti) : जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळख निर्माण केलेल्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा हळदीची विक्रमी आवक होत आहे. आठवड्यातून गुरुवार व रविवार दोन दिवस हळद खरेदी केल्या जातात असून आठवड्याला दहा हजार क्विंटल ची आवक होत आहे वाढती आवक, शेतकऱ्यांना मिळणारी बाजारपेठ आणि बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात येत असलेले नियोजन यामुळे रिसोडची ओळख आता केवळ तालुक्याचे बाजारपेठीय केंद्र एवढी राहिलेली नसून हळदीचे हब म्हणून अधोरेखित होत आहे.
           
मागील चार-पाच वर्षापासून सिंचनाखाली शेती असलेल्या शेतकऱ्यांचा हळद लागवडीकडे कल वाढला आहे हळद हे   शेतकऱ्यांचे महत्त्वाचे नगदी पीक म्हणून पुढे आले आहे आहे. मागील काही वर्षांत हळदी खालील क्षेत्र वाढत असताना तिच्या विक्रीसाठी सक्षम आणि पारदर्शक बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन हळद खरेदीचा निर्णय घेण्यात आला परिसरात लागवडीत झालेली वाढ व निर्माण झालेली बाजारपेठ  त्यामुळे समितीमध्ये होणारी विक्रमी आवक ही स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी निश्चितच सकारात्मक बाब म्हणावी लागेल.

शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळद विक्रीसाठी रिसोडची बाजारपेठ पसंत करणे, ही बाजार समितीवरील वाढत्या विश्वासाची पावतीच म्हणावी लागेल यापूर्वी शेतकऱ्यांना हळद विक्रीसाठी हिंगोली वसमत व सांगली या ठिकाणी जावे लागत होते परंतु मागील तीन वर्षापासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने हळद खरेदीचा निर्णय घेतल्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या मराठवाड्यासह लोणार मेहकर या सह जिल्ह्याच्या बाहेरून हळद विक्रीसाठी येत आहे.

विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालाची योग्य हाताळणी, आवक व्यवस्थापन, लिलाव प्रक्रियेचे नियोजन, व्यापारी आणि शेतकरी यांच्यातील समन्वय तसेच गर्दीच्या काळात निर्माण होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी करण्यात येणारे व्यवस्थापन यामुळे बाजार समितीची कार्यक्षमता अधोरेखित होत आहे. बाजार समिती ही केवळ शेतमालाची खरेदी-विक्री करणारी संस्था नसून शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे केंद्र असते. त्यामुळे तिचे नियोजन जितके सक्षम, तितका शेतकऱ्यांचा बाजारपेठेवरील विश्वास अधिक मजबूत होतो.

मात्र विक्रमी आवकेसोबत जबाबदारीही तितकीच वाढते. हळदीला योग्य भाव मिळणे, वजन मापात पारदर्शकता राहणे, लिलाव प्रक्रिया निष्पक्ष होणे आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या गुणवत्तापूर्ण मालाचा योग्य मोबदला मिळणे, ही बाजार समितीची खरी कसोटी आहे आवके चा आलेखा  चढता असल्यामुळे बाजार समिती या कसोटीत खरी उतरली असल्याच्या भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत.

विक्रमी आवक हा अभिमानाचा विषय आहे मात्र शेतकऱ्याला विक्री आणि न्याय्य दर मिळणे हेच त्याचे खरे यश ठरेल. (Risod Bazar Samiti) उत्कृष्ट नियोजनाची ही वाटचाल अधिक सक्षम करून रिसोडला हळदीचे कायमस्वरूपी व्यापारी केंद्र बनविण्याची जबाबदारी आता बाजार समिती प्रशासनासह सर्व संबंधित घटकांची आहे. वाढती आवक लक्षात घेता आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार हळदीची खरेदी करण्यात येत आहे आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी साडेचार हजार क्विंटल ची आवक झाली असून सतरा हजार रुपये भाव मिळाला आहे दर आठवड्याला दहा हजार क्विंटल ची आवक होत आहे.

मागील दहा ते पंधरा वर्षापासून सिंचनाच्या सुविधा वाढल्या आहेत शेतकऱ्यांचा हळदी या शाश्वत पिकाकडे कल वाढला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या विक्रीच्या अडचणी लक्षात घेऊन येथील बाजार समितीमध्ये हळद खरेदीचा निर्णय घेण्यात आला त्याचबरोबर हळद परिषद घेऊन शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान व प्रोत्साहन दिले. 
- विष्णुपंत भुतेकर, सभापती , कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड. 

वाढती आवक लक्षात घेऊन तसे नियोजन करण्यात येत आहे जिल्ह्या बाहेरूनही माल येत आहे त्या शेतकऱ्यांनाही कुठे अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे .
-विजयराव देशमुख, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड.

संबंधित सामग्री

नवीन सोयाबीन खरेदीचा शुभारंभ; पहिल्याच लिलावात ६,१०० रुपये प्रतिक्विंटल दर

नवीन सोयाबीन खरेदीचा शुभारंभ; पहिल्याच लिलावात ६,१०० रुपये प्रतिक्विंटल दर

Risod Bazar Samiti: स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन सोयाबीन हंगामाच्या खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या हंगामातील नवीन सोयाबीन घेऊन आलेले शेतकरी एकनाथ मुंढे (रा. सावरखेडा) यांचा बाजार समिती

Sep 22, 2026
फेरभाडेपट्ट्याला मान्यता, रिसोड बाजार समितीला मिळणार दीड कोटींवर महसूल!

फेरभाडेपट्ट्याला मान्यता, रिसोड बाजार समितीला मिळणार दीड कोटींवर महसूल!

Risod Bazar Samiti: कृषी उत्पन्न बाजार समिती, रिसोडच्या आर्थिक उत्पन्नवाढीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या दूरदर्शन केंद्राच्या जागेच्या फेरभाडेपट्टयाला शासनस्तरावर मान्यता मिळाली आहे.

Aug 31, 2026
विनापरवाना शेतमाल खरेदी केल्यास होणार कारवाई

विनापरवाना शेतमाल खरेदी केल्यास होणार कारवाई

Risod Bazar Samiti: शेतमाल खरेदी-विक्री व्यवसायात सुसूत्रता आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी पणन संचालनालयाने आता कंबर कसली

May 14, 2026