परभणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन!
परभणी (Farming) : बदलत्या वातावरणात शेती समोर मोठी आव्हाने उभी टाकली आहेत. त्यात अल्पभुधारक शेतकर्यांसमोर मोठे संकट आहे. वातावरणीय बदलानुसार सुरक्षित शेतीला शेतकर्यांनी (Farmers) प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात गुरुवार 29 मे रोजी आयोजीत 53 व्या संयुक्त कृषी संशोधन विकास समितीच्या (Agricultural Research and Development Committee) बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
वनामकृवित संयुक्त कृषी संशोधन विकास समितीची बैठक!
यावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, राज्यमंत्री अॅड. आशिष जैस्वाल, कुलगुरु डॉ. इंद्र मणि, खा. संजय जाधव, आ.डॉ. राहुल पाटील, आ.डॉ. रत्नाकर गुट्टे, आ. राजेश विटेकर, आ. सतीश चव्हाण, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, सीईओ, नतीशा माथुर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव, कुलसचिव संतोष वेणीकर, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, राज्याचे प्रधान कृषी सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्यासह कार्यकारी परिषद सदस्य प्रविण देशमुख आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वनामकृवित संशोधन विकास समितीची बैठक होत असून ही आनंदाची बाब आहे. शास्त्रज्ञांनी शेती बांधावर जावून शेतकर्यांना संशोधनाची माहिती द्यावी, त्यांच्याशी संवाद साधुन प्रश्न सोडवावेत. शेती क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती, संस्था यांचे समन्वय आसावे यासाठी केंद्र व राज्य शासनाने (Central And State Government) संयुक्तरित्या उपक्रम सुरू केला आहे. याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीतील उत्पादकता वाढवावी!
सध्या शेतकरी दुष्ट चकरात आडकला आहे. शेतकर्यांना यातून बाहेर काढण्यासाठी शेतीत गुंतवणूक होणे आवश्यक आहे. वातावरणानुसार शेती करणे गरजेचे असून शास्त्रांनी देखील वातावरणीय बदलानुरुप बियाणे, शेतीचे वाण विकसित करावेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीतील उत्पादकता वाढवावी. शेतीत विविध प्रयोग करणार्या संशोधक शेतकर्यांना कृषी संशोधक म्हणून त्यांचा गौरव करावा. शेतकर्यांनी देखील विविध शासकीय योजनांचा लाभ घेत शेतीची उत्पादकता व उत्पन्न वाढवावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले. बैठकीची सुरुवात दिपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी विद्यापीठ विकसित कापूस वाणापासून तयार करण्यात आलेली शॉल, स्मृतिचिन्ह देवून मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी विद्यापीठातर्फे तयार करण्यात आलेल्या स्मरणीका, माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (Government Medical College) भुमिपूजन तसेच इतर विकास कामाचे उद्घाटन झाले.
शेतकरी लाभदायक संशोधन व्हावे!
कृषी क्षेत्रात महाराष्ट्र आग्रगण्य स्थानी आहे. कृषीतील प्रगतीचा वेग वाढविण्याची गरज आहे. विद्यापीठांद्वारे शेतकरी लाभदायक संशोधन व्हावे, एआयचा वापर (Use of AI) या संशोधनात महत्वाचा ठरेल. विकसित भारत विकसित कृषी (Developed India Developed Agriculture) या संकल्पावर आधारित काम होणे गरजेचे आहे.
– अॅड. आशिष जैस्वाल, राज्यमंत्री
उत्पादन वाढ करताना खर्च कमी करणे गरजेचे!
शेतकर्याला त्याच्या बांधावर जावून मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. शेतकर्यांसाठी चांगले वाण शोधणे काळाची गरज आहे. शेतीतील उत्पादन (Agricultural Production) वाढ करत असताना, उत्पादन खर्च कमी करणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठांनी शेतीतील विविध सुधारणा बांधावर जावून शेतकर्यांना समजावाव्यात. बदलत्या वातावरणामुळे शाश्वत शेती करणे आवश्यक आहे.
– अॅड. माणिकराव कोकाटे, कृषीमंत्री