कुणाचे जोडावे आधार कार्ड?
सरकार काय उपाययोजना करणार?
मानोरा (Ladki Bahin Yojana) : लाडक्या बहिणीचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. काहींच्या बँक खात्यातही रक्कम जमा झाली आहे. पण ई केवायसीतील एक मोठी अट काही लाडक्या बहिणींची काळजी वाढवणारी ठरली आहे. लाडक्या बहिणीचा सप्टेंबर महिना जमा होत असल्याने राज्यातील लाभार्थी लाडकी बहीण आनंदून गेले आहेत. त्यांना दिवाळीपूर्वीच थोडीफार रक्कम हाती आली आहे.
लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) नोव्हेंबर महिन्यापर्यंत ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. अनेक महिला त्यासाठी मोठी कसरत करीत असल्याचे दिसत आहे. कधी तर साईड डाऊन झाल्यानंतर दिवसभर त्यांना ताटकळत बसावे लागते. तर ग्रामीण भागात डोंगराळ भागातील लाडक्या बहिणींना रेंजसाठी उंच भागावर जावे लागत असल्याचे समोर येत आहे. त्यातच ई केवायसी करताना पती अथवा वडिलांचे आधार कार्ड जोडण्याची नवीन अट काही (Ladki Bahin Yojana) लाडक्या बहिणीसाठी मोठी जाचक ठरत आहे. त्या महिलांना आता लाडक्या बहिणी योजनेला कायमचे मुकावे लागणार की काय? अशी भीती सतावत आहे. याप्रकरणी सरकारने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
लाभासाठी ई केवायसी बंधनकारक !
या (Ladki Bahin Yojana) योजनेची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याची सविस्तर माहिती, पती अथवा वडिलांचे आधार कार्ड क्रमांक नोंदवावे लागणार आहे. तरच ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. हा लाभ घेण्यासाठी ई केवायसी बंधनकारक ठरविण्यात आली आहे.
