घाटंजी (Father Murder Case) : दारूच्या व्यसनाचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात, याचा प्रत्यय तालुक्यातील ऐरंडगाव येथे आला. दारूच्या वादातून मुलानेच पित्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली असून, या (Father Murder Case) घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऐरंडगाव येथील पुंडलीक दाऊजी कांबळे (५५) , जात मातंग) यांना दारू पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे घरात सतत वादविवाद होत असत. या वादामुळे त्यांचा मुलगा आदर्श कांबळे वारंवार वडिलांशी भांडत असे. २ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुंडलीक कांबळे घराबाहेर असताना, वादाच्या पार्श्वभूमीवर मुलगा आदर्श याने फावड्याच्या दांड्याने त्यांच्या पाठीवर जोरदार वार केला. एवढ्यावर न थांबता त्याने वडिलांना खाली पाडून छाती व पोटावर लाथाबुक्क्यांनी (Father Murder Case) बेदम मारहाण केली.
या निर्दयी मारहाणीमुळे पुंडलीक कांबळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पारवा पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन पंचनामा केला. या (Father Murder Case) प्रकरणी पारवा पोलिस ठाण्यात अप.क्र. ५०६/ २०२५, कलम १०३(१) भा.दं.सं. २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी मुलगा आदर्श कांबळे याला अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदिप नरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार सुरेश येडपुलवार करीत आहेत. दारूच्या व्यसनामुळे पित्याचीच हत्या घडवून आणणार्या या घटनेने ऐरंडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.