शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नेताजी सुभाष चंद्र बोस चौक दरम्यान होत असलेल्या निकृष्ट रस्त्याच्या तक्रारी संदर्भात
पुसद (Abhijit Vaikos) : शहरांमध्ये गेल्या अंदाजे तीन वर्षांपासून नगरपालिकेमध्ये प्रशासक राज सुरू आहे. तर नगर प्रशासन मध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासनामध्ये अधिकार राज आलेला आहे. मात्र कुशल प्रशासन चालविण्याकरिता मुख्याधिकारी तथा नगरपालिकेचे प्रशासक अभिजीत वायकोस हे काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसत आहेत.
मात्र शहरांमध्ये होत असलेले विकास कामे अर्थातच अवघ्या काही महिन्यापूर्वी बनविलेले कोट्यावधीचे रस्ते, डांबरी रस्ता असो अथवा सिमेंट काँक्रीटचे कंत्राटदाराच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे व निकृष्ट दर्जाचे बनवीत असल्यामुळे काही दिवसातच ते खराब झालेले दिसत आहेत. मुख्याधिकारी यांच्या निवासस्थानासमोर बनविण्यात आलेला सिमेंट काँक्रीट चा रस्ता अवघ्या काही दिवसातच उकडून गेला. तर शहरांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले चौक ते नाईक चौक दरम्यान गेल्या वर्षी बनविण्यात आलेला दीड कोटी रुपयाचा डांबरी रस्ता हा अवघ्या सहा महिन्यातच उखडून गेला. तर दैनिक देशोन्नतीने या संदर्भात वारंवार वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
तर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नेताजी सुभाष चंद्र बोस चौक दरम्यान होत असलेला रस्ता सध्या भाऊ चर्चित झालेला आहे. या रस्त्याचे काम गेल्या सात महिन्यापासून सुरू आहेत तर कंत्राटदाराने दोन्ही बाजूवर व खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या संदर्भातही दैनिक देशोन्नतीने प्रशासनाचे लक्ष वेधले होते वृत्त प्रकाशित करून. अखेर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक शंकरराव बाबर यांनी मुख्याधिकाऱ्यांना या रस्त्यावर बोलावून घेऊन परिस्थिती प्रत्यक्षात दाखवली. मुख्याधिकाऱ्यांनीही या संदर्भात आपल्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना योग्य ते सूचना दिल्या तर ठेकेदारालाही योग्य त्या सूचना दिल्या अन्यथा कामामध्ये सुधारणा झाल्यास कारवाईचा इशारा पण दिला यावेळी अनेक नागरिकांसह पत्रकार उपस्थित होते हे विशेष.