Risod:- रिसोड तालुक्यातील पिंपरखेड येथे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा (Central Bank Branch) वाकद तसेच नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने 18 डिसेंबर रोजी 1 वाजता वित्तीय आणि डीजीटल साक्षरता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तराव घुगे हे होते तर मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वाकद शाखेचे शाखाधिकारी डी.डी.बाजड, तालुक्याचे मार्केटींग ऑफीसर ग्रेड-1 पी.डि जाधव व निरीक्षक-पी.के.राउत हे होते.
1 वाजता वित्तीय आणि डीजीटल साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन
जिल्हा मध्यवर्ती बँक नाबार्डच्या सहकार्याने विवीध प्रकारच्या योजना लाभार्थी, शेतकरी, कर्मचारी,व्यावसायीक यांच्या साठी राबवत असते या योजनांच्या माध्यमातुन लोकांना आपली आर्थिक स्थिती सुधारण्या मागीणी जागरूक करते त्यांच प्रमाणे बचत व गुंतवणुक करण्यासाठी प्रावृत्त करते. आर्थिक समर्थता, तसेच आर्थिक व्यवहार डीजिटल (Digital)पध्दतीने साहाय्य करते.ज्यामुळे व्यक्ती व कुटुंबाची प्रगती होते. आर्थिक साक्षरतेबरोबरच डीजीटल पध्दतीने बँकींग व्यवहार कसे केले जातात त्यामुळे वेळ व माणसाची कशी बचत होते तसेच पी.एम,डीस.बी. वाय.व पीएम.जे.जे.बी.वाय. विम्याचे फायदे सांगत प्रत्येकाने या हा विमा काढावा असे आवाहन करत या संदर्भात माहीती देण्यात आली. 115 वर्ष पुर्ण झालेली दि. अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती बॅक डीजीटल वित्तीय साक्षरतेत ही कमी नसुन बँकेमार्फत एटीटीएम,क्रेडीट कार्ड, मोबाईल बॅकिंग अप, फोन पे. पॉश मशीन, क्यूआर कोड (QR Code) आदी बँकींग विषयक सेवा-सुविधा जनसामान्यां साठी उपलब्ध करून देत आहेत.
कार्यक्रम यशस्वी करीता वाकद शाखेचे डब्लू एम.शेख, एस.व्ही गोसावी, संस्थेचे सचिव उमेश देशमुख तसेच गणेश जाधव यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थीत होती.




