गृहमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागून पोलीस प्रशासनावर कारवाई करावी : राहुल भाऊ बोंद्रे
चिखली (Farmer Andolan) : चिखली विधानसभा मतदारसंघातील तीन हजार शेतकऱ्यांचे मागण्यांचे रक्ताचे निवेदन १९ सप्टेंबरला बुलढाणा येथे मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी आलो असता पोलिस प्रशासनाकडून माझी व सहकार्यांची अडवणूक करण्यात आली. जबरदस्तीने (Farmer Andolan) शेतकऱ्यांच्या रक्ताचे निवदेन हिसकावून जिल्हा पोलीस प्रशासनाने फाडले. हा शेतकऱ्यांच्या रक्ताचा घोर अपमान असल्याने गृहमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागून पोलीस प्रशासनावर कडक कारवाई करावी, यासाठी आदर्श गाव सावरगाव डुकरे येथे सोमवार २३ सप्टेंबर पासून आम्ही शेतकऱ्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. गृहमंत्री व पोलीस प्रशासनाने त्यांच्या केलेल्या शेतकरी विरोधी कृत्यासाठी माफी मागेपर्यंत हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरुच राहील, असे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आ. राहुल भाऊ बोंद्रे यांनी सांगितले.
सोयाबीनला ७ हजार रुपये भाव, थकलेला पिक विमा, शेतकऱ्यांना कर्जमाफी, सिंचन अनुदानाचा अनुशेष, शेतकऱ्यांना दिवसा सलग १२ तास वीज, वन्य प्राण्यांपासून संरक्षण या मागण्यांसाठी शेतकरी रक्ताच्या निवेदनाने असंतोष व्यक्त करत असतांना त्यांच्या मागण्यावर चर्चा तर नाहीच उलटपक्षी निवेदन फाडणे म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले.
आदर्श गाव सावरगाव डुकरे येथे आज शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी सुरु करण्यात आलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलन (Farmer Andolan) प्रसंगी बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमितीचे आध्यक्ष राहुल भाऊ बोन्द्रे यांच्या सह इतर असंख्य शेतकरी सहभागी झाले.
दिवसभरात आंदोलनाला 1हजार शेतकऱ्यांच्या भेटी
गोरगरिबांच्या सेवेत आयुष्य अर्पण केलेल्या सर्व महापुरुषांना वंदन करून, शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान केल्याच्या व शेतकऱ्यांवर दडपशाही करणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ आदर्श गाव सावरगाव डुकरे येथे अन्नत्याग आंदोलनाला सोमवार पासून सुरुवात करण्यात आली आहे. या (Farmer Andolan) आंदोलनाला २३ सप्टेंबर रोजी १ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी भेटी देवून आपला पाठिंबा दर्शविला आहे तर आंदोलनस्थळी महाविकास आघाडीचे चिखली मतदारसंघतील पदाधिकीरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैयक्तिक विरोध त्यांना कुठेही करता येईल
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी व विरोधक यांनी एकजूट दाखवून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करणे अपेक्षित असतांना फक्त मला वैयक्तिक विरोध म्हणून शेतकऱ्यांवर तुम्ही अन्याय करत आहात. सरकारला (Farmer Andolan) शेतकऱ्यांचा अपमानाचा हिशोब न मागता तुम्ही त्यांच्या मागण्यांना विरोध करतांना दिसत आहे. माझा वैयक्तिक विरोध त्यांना कुठेही करता येईल, तसा ते करत आलेलेही आहे. मात्र विरोधकांची शेतकऱ्यांना सहानुभूती नसणे हा दुर्देवी प्रकार असल्याचेही राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले
