Gadchiroli :- जिल्ह्यात निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी स्थानीक प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून आतापर्यंत शेकडो नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
स्थानीक प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा पुढाकार
जिल्हयातील पुरपरिस्थीती व गोसीखुर्द धरणातून ११००० क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग केल्यामुळे कोटगल (गडचिरोली) बॅरेजचे ४२ दरवाजे खुले करण्यात आले. धरणाच्या गेटचे तनत् १८९ Rथ् आहे. दुपारी १२ वाजता मोजणी केले असता १९४ Rथ् झाली. पुढील ३ तासात पाणी वाढून १९७ Rथ् होऊ शकते. तेव्हा वैनगंगा नदीचेनाल्यामध्ये येऊन धरण ते कोटगल मार्ग बंद होऊ शकतो.
सन २०२४ मध्ये धरणाच्या कामावरील पश्चिम बंगाल व स्थानिक मजूर अडकून राहील्याने त्यांचे जिवीताला कोणतीही हानी होऊ नये म्हणून प्रशासनास मोठी कसरत करुन बोटीव्दारे नागरिकांना बाहेर काढावे लागले. तिच पुनरावृत्ती यावर्षी होऊ नये म्हणून गडचिरोली तालुका प्रशासनाकडून वेळीच खबरदारी व वेळीच दखल घेऊन एकूण १३२ मजुरांना सुरक्षित स्थळी वाहनद्वारे बाहेर स्थलांतरित करण्यात आले. अजयदीप कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट कंपनी (Construction Private Company) मुंबई कडून सर्व मजूराची भोजन व निवासाची व्यवस्था गडचिरोली येथील विसापूर मार्गावरील कोहळे हॉल येथे करण्यात आली.