मोटारसायकल काढत असताना गाडीसह दोन्ही इसम वाहुन गेले!
कोरची (Flood) : कोरची इथून 7 किमी अंतरावर असलेल्या, सोनपूर येथील दोन इसम नातेवाईकाच्या मरणाला गेले होते. परत येत असताना बेडगाव-पुराडा दरम्यान, असलेल्या नाल्यावर पुर होता. या पुरातून मोटारसायकल काढत असताना गाडीसह दोन्ही इसम वाहुन गेले. गावकऱ्यांनी शोध मोहीम राबवून त्यांचे शव चौथ्या दिवशी शोधून काढले.
दोघेही इसम गाडीसह पुरात वाहुन गेले, हे दृश्य प्रवाशांनी बघीतले!
सविस्तर वृत्त असे की, कोरची वरून सात किमी अंतरावर असलेल्या सोनपूर येथील तलवारशहा मडावी वय 45 वर्षे आणि देवसाय मडावी वय 60 वर्षे, हे दोघेही कुरखेडा तालुक्यातील सलंगटोला येथील त्यांच्या नातेवाईकाच्या मरणाला 23 जुलै ला गेले होते. मय्यत आटोपून ते दोघेही परत यायला निघाले. पुराडा-बेडगाव दरम्यान नाला आहे. त्या नाल्यावर पुर होता. तरीही लोक त्या पुरातून मोटारसायकल काढत होते. मृतक तलवारशहा मडावी यांनी सुध्दा पुरात गाडी टाकली. परंतु त्या गाडीचा तोल सांभाळता आला नाही. व दोघेही इसम गाडीसह पुरात वाहुन गेले. हे दृश्य मागच्या बाजूने येणाऱ्यास प्रवाशांनी बघीतले. व बेडगाव येथील पोलीसांना कुणीतरी पुरात वाहुन गेल्याची माहिती दिली.
माहिती पोलीसांनी सोनपूर येथील लोकांना दिली!
दुसऱ्या दिवशी पोलीसांनी शोधमोहीम राबविले. त्यांना त्यांची मोटारसायकल रस्त्यापासून 300 मीटर अंतरावर मिळाली. परंतु मृतकांचा पत्ता लागला नाही. मोटारसायकल च्या नंबर वरून ते सोनपूर येथील आहेत, हे पोलीसांना (Police) कळले. त्याची माहिती पोलीसांनी सोनपूर येथील लोकांना दिली. तेथील संपूर्ण गावकरी (Villagers) सरपंच मोहन कुमरे यांच्या नेतृत्वाखाली 3 दिवस शोधमोहीम (Expedition) राबविले. अखेर 26 जुलै ला त्या दोघांचे मृतदेह मिळाले.
सावधगिरी आवश्यक!
तो नाला बेडगाव वरून 5-6 किमी अंतरावर आहे. डोंगर दऱ्यांमधून येणाऱ्या पाण्यामुळे तो नाला तयार झाला आहे. त्या नाल्यावर फारसा पुर राहत नाही. परंतु, एखाद्या वेळी दिवसभर पाऊस पडत असेल, तर पुर राहणारच आहे. या नाल्याला पहाडी वरून पाणी येत असल्याने त्या पाण्याचा वेग जास्त राहतो. अशा वेळी सावधगिरी आवश्यक आहे.
