रात्री बिनधास्त सहा चोरटे फिरताना CCTV फुटेज सोशल मीडियावर व्हायरल
परभणी/जिंतूर (Parbhani Crime) : शहरात मागील काही दिवसांपूर्वी चोरीच्या घटना ताज्या असताना पुन्हा दोन कॉलनीमध्ये सहा चोरट्यांची गँग बिनधास्त चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परिणामी (Parbhani Crime) पोलिसांची भीती चोरट्यांना राहिली नसल्याने नागरिकांत भिती व दहशतीचे वातावरण दिसून येत आहे.
मागील काही दिवसांपासून जिंतूर शहरासह ग्रामीण भागात चोऱ्यांचे सत्र वाढत चाललेले आहे. परिणामी पोलिसांकडून अद्यापही एकाही चोरीच्या घटनेत तपासात कुणाला अटक झाली. नसल्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढत चाललेले दिसून येत आहे. याचाच (Parbhani Crime) परिणाम जिंतूर शहरात मंगळवारी रात्री दोन ते तीनच्या सुमारास सहा अज्ञात चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधून शहरातील संभाजीनगर,गजानन नगर आनंद नगर येथे एका ठिकाणी चोरी केली.
परंतु याबाबत पोलीसात गुन्हा नोंद झाला नसून काही ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला आहे. (Parbhani Crime) परिणामी चोरट्यांचे टोळके बिनधास्त रस्त्याने फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सहा चोरट्यांनी विविध भागात हातात शस्त्र घेऊन दिसत आहेत. त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. म्हणून पोलीस प्रशासनाने अज्ञात चोरट्यांचा छडा लावावा व शहरात पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी शहरातील नागरिक करत आहेत.




