सुदैवाने जीवित हानी टळली परभणीच्या भोसी रस्त्यावरील घटना
परभणी/जिंतूर (Parbhani Accident) : येथून 80 प्रवासी घेऊन एस टी बस कावी कडे जात असतांना रस्त्यात शेवडी च्या पुढील भोसी रस्त्यावरील चढावर बस माघारी येत असल्याने चालत्या बस मधून प्रवाश्यानी दारातून उडया मारून खाली उतरले व बस रस्त्याच्या खाली उतरली या अपघातात काही प्रावश्यना किरकोळ मार लागल्याची घटना सोमवार दि 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भोसी रस्त्यावर घडली.
या बाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर आगाराची बस क्रमांक एम एच 20 बी एल 0588 ही 80 ते 90 प्रवासी घेऊन कावी कडे जात होती. शेवडी पाटी ओलांडल्यानंतर भोसी कडे जाण्यासाठी चढ चढावा लागतो. या चढावर बस चढत असताना अचानक बस माघारी यायला लागली घाबरून काही प्रवाश्यानी चालत्या बस मधून खाली उडया मारल्या. बस चालकाने ब्रेक मारून (Parbhani Accident) बस थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु बस न थांबता पाठीमागून येणाऱ्या जिंतूर ते सावरगाव कडे जाणाऱ्या एम एच 14 बी टी 2163 या बस ला धडकली या बस मध्ये जवळपास 70 प्रवासी होते. त्या नंतर कावी कडे जाणारी बस ही रस्त्या खाली उतरली.
जिंतूर आगारात नादुरुस्त बसेस चा भरणा
जिंतूर अगार एकेकाळी जिल्ह्यात सर्वात जास्त नफा कमावणारे आगार म्हणून प्रसिद्ध होते. ओरतु तालुक्यातील ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाल्याने बसेस ही खिळखिळ्या झाल्या असून, (Parbhani Accident) जिंतूर परभणी सारख्या चकचकीत रस्त्यावर दररोज बसेस नादुरुस्त होण्याच्या घटना घडत आहेत तर, ग्रामीण भागातील बसेस च्या दुर्दशे बाबत न बोललेच बरे…