१६ लाख रुपयांनी फसवूणक केल्याने गुन्हा दाखल
हिंगोली (Talathi Post) : फसवणूकीच्या अनेक घटना घडत असताना आता तर हिंगोली जिल्हा निवड समितीच्या (Talathi Post) तलाठी पदाकरीता नौकरीचे बनावट आदेश देऊन १६ लाख रुपयाने फसवणूक केल्या प्रकरणी वसमत शहर पोलिसात तिघां विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, परभणी जिल्ह्यातील एरंडेश्वर कमांडो करिअर अॅकॅडमी प्रशिक्षण केंद्राचे सतिष आप्पाराव राक्षसे यांची वसमत येथे बहिर्जी नगरात कमांडो करिअर अकॅडमी असल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते, १४ नोव्हेंबर २०२३ रोजी सतिष राक्षसे यांचा मित्र जितेंद्र मच्छेंद्र कांबळे रा. लिंबाळा (दौ) जि. लातूर याने सतिष दूरध्वनीवर संपर्क साधून तलाठी (Talathi Post) किंवा वनरक्षक पदाची नौकरी लावण्या करीता पुणे येथे नंदी चंद्रमुनी दिवाकर रा. पिंपळे गुरव पुणे याला भेटण्यासाठी जायचे आहे असे सांगितले.
त्यावरून सतिष राक्षसे व जितेंद्र कांबळे हे दोघे पुणे येथे गेले होते. सदर ठिकाणी नंदी दिवाकर याने सतिषला (Talathi Post) तलाठी किंवा वनरक्षक पदाची नौकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यासाठी रक्कम द्यावी लागेल असे सांगितल्याने सतिषने आपल्या काही मित्रांकडून उधार घेतलेले १६ लाख २ हजार रुपये नंदी याला वेळोवेळी पाठविले. त्यानंतर नंदी याने सतिषच्या व्हॉटस् अॅपवर तलाठी पदाची हिंगोली जिल्हा निवड यादीची पीडीएफ फाईल पाठवून त्यामध्ये सतिषचा ८ वा क्रमांक असल्याचे दर्शविले. सतिषला तलाठी पदाची नौकरी लागल्याचा खुपच आनंद झाला.
परंतु त्याने (Talathi Post) निवड यादीची खात्री केली असता कुठेही त्याचे नाव दिसून आले नाही. त्यानंतर त्याने आपल्या व्हॉटस् अॅपवर पाठविलेल्या यादीची पुन्हा पडताळणी केली असता खाडतोड करून त्याचे नाव टाकल्याचे दिसून आले. यामध्ये आपली फसवूणक झाल्याचे सतिषला कळताच त्याने नंदीकडे पैसे परत देण्याची मागणी केली. परंतु त्याने पैसे देण्याकरीता टाळाटाळ केल्याने २० मार्च रोजी सतिष राक्षसे यांनी वसमत शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून जितेंद्र मच्छींद्र कांबळे रा. लिंबाळा (दौ) जि. लातूर, नंदि चंद्रमुनी दिवाकर रा. पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव पुणे या दोघा विरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब कसबेवाड, जमादार प्रशांत मुंढे हे करीत आहेत.