Parbhani :- परभणी शहरात बनावट एटीएम कार्ड (ATM Card) तयार करत एका महिलेच्या बँक खात्यातून १ लाख ५ हजार रुपये काढून घेत फसवणूक (Fraud) करण्यात आली. या प्रकरणी २३ मे रोजी अज्ञातावर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँक खात्यातून १ लाख ५ हजार रुपये काढून घेत केली फसवणूक
सविता लोखंडे या महिलेने तक्रार दिली आहे. सदर महिलेचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बचत खाते आहे. व्यवहारासाठी फिर्यादीकडे एटीएम कार्ड आहे. महिला वापरत असलेल्या एसटीएम कार्डचे दुसरे बनावट एटीएम कार्ड बनवून परभणी शहरातील जिंतूर रोडवरील एटीएम मधून अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या महिलेच्या सहमती विना १ मे १७ मे या कालावधीत बँक खात्यातून १ लाख ५ हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. खात्यातून रक्क्म कमी झाल्याचे लक्षात आल्यावर सविता लोखंडे यांनी नानलपेठ पोलीस ठाणे गाठत अज्ञाताविरुध्द तक्रार दाखल केली आहे. तपास पोउपनि. जटाळ करत आहेत.