आमदार संतोष बांगर व न.प.चे माजी सभापती श्रीराम बांगर यांच्या वतीने मोफत खेळण्यांचा उपलब्ध करून दिला लाभ
हिंगोली (Hingoli Dussehra Exhibition) : शहरातील रामलीला मैदानावर श्री सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने औद्योगिक व कृषि प्रदर्शनी भरण्यात आली होती. (Hingoli Dussehra Exhibition) महोत्सवाच्या शेवटच्या टप्यात १२ ऑक्टोंबर रविवार रोजी आमदार संतोष बांगर व न.प. सभापती श्रीराम बांगर यांच्या तर्फे नागरीकांसाठी मोफत मनोरंजनाचे खेळ उपलब्ध करून दिल्याने सर्वसामान्य नागरीकांनी त्याचा आनंद लुटला.
हिंगोली शहरातील श्री सार्वजनिक दसरा महोत्सव (Hingoli Dussehra Exhibition) सर्वदूर प्रसिध्द आहे. म्हैसुर नंतर हिंगोलीतील दसरा महोत्सवाचा दुसरा क्रमांक येतो. त्यामुळे दसरा महोत्सव समितीच्या वतीने मागील अनेक वर्षापासून औद्योगिक व कृषि प्रदर्शनी भरविली जाते. या प्रदर्शनीत महाराष्ट्रासह इतर राज्यातून अनेक व्यावसायीक सहभागी होत असतात. समितीच्या वतीने मागील काही वर्षापासून लिलाव प्रक्रीयेव्दारे खेळण्यांचे साहित्य व इतर स्टॉल व्यवसायीकांना भाडे तत्वार दिले जातात.
यंदा औद्योगिक प्रदर्शनीमध्ये अनेक खेळणे उपलब्ध झाले होते. त्यामुळे नागरीकांनी औद्योगिक प्रदर्शनीत अनेक खेळण्यांसह विविध वस्तू खरेदीचा लाभ घेतला. या प्रदर्शनी करीता महोत्सव समितीने २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर पर्यंतचा कालावधी दिला होता. परंतु मध्यंतरी झालेल्या काही दिवसाच्या अतिवृष्टीमुळे दसरा मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने प्रदर्शनीतील खेळणे व दुकाने व्यवसायीकांनी बंद ठेवले होते. जेंव्हा समितीने या चिखलावर गिट्टीची चुरी टाकल्यानंतर प्रदर्शनी पुर्ववत सुरू झाली.
त्यामुळे काही दिवसाचा कालावधी वाढवून द्यावा, यासाठी (Hingoli Dussehra Exhibition) मनोरंजनाच्या खेळण्यांसह इतर व्यवसायीकांनी मध्यंतरी एक दिवस प्रवेशव्दारावर बसून प्रदर्शनी बंद पाडली होती. त्यामुळे झालेल्या अतिवृष्टीने व्यवसायीकांचे नुकसान लक्षात घेता दिलेल्या मुदतीपेक्षा काही दिवस अतिरिक्त प्रदर्शनी चालू ठेवण्याकरीता महोत्सव समितीने मुभा दिली होती. ही प्रदर्शनी शेवटच्या टप्यात आली असताना १२ ऑक्टोंबर रविवार रोजी आमदार संतोष बांगर व नगर पालिकेचे माजी सभापती श्रीराम बांगर यांच्या वतीने सर्वसामान्य नागरीकांकरीता प्रदर्शनीतील सर्व मनोरंजनाचे खेळ मोफत उपलब्ध करून दिले होते.
त्यामुळे या खेळण्यांचा आनंद सर्वसामान्य नागरीकांनी घेतला. यावेळी रत्नाकर बांगर, माजी नगर सेवक सुभाष बांगर आदी उपस्थित होते. तसेच प्रदर्शनीत गोंधळ होऊ नये, या दृष्टीने उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, महिला पोउपनि श्रीदेवी वग्गे यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.