परभणी (Parbhani):- जबरी चोरीतील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी मागील चार वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. पुढील कारवाईसाठी त्याला नानलपेठ पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
येथील नानलपेठ पोलीस ठाण्यात सन २०२१ मध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील आरोपी फरार होता. लिस्टवर असलेल्या या आरोपीचा शोध पोलीस घेत होते. मात्र मागील चार वर्षापासून आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. फरार आरोपी राजू लक्ष्मण शिराळे वय ३२ वर्ष हा परभणी शहरात आला असल्याची गोपनीय माहिती स्थागुशाच्या पथकाला मिळाली. या माहितीवरुन सापळा रचत शिताफीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई स्थागुशाचे सपोनि. राजू मुत्तेपोडे, सपोउपनि. मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, रवि जाधव, सुर्यकांत फड, शेख रफिक, परसोडे यांच्या पथकाने केली.