विविध घोषणांनी तहसील कार्यालयाचा परीसर निनादला
गडचिरोली (Farmers debt relief) : निवडणूक जाहीरनाम्यात राज्य सरकारकडून शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात अजूनही त्या आश्वासनांची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे किसान ब्रिगेड च्या वतीने आज १४ मे रोजी शेकडो शेतकर्यांनी गडचिरोली जिल्ह्यात किसान कर्जमुक्तीचे अर्ज (Farmers debt relief) तहसील कार्यालयात शिस्तीत सादर केले.
यावेळी (Farmers debt relief) कर्जमुक्ती झालीच पाहिजे, किसान ब्रिगेड जिंदाबाद, लोकनायक प्रकाश भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है, आदी घोषणा देत शेतकर्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. किसान ब्रिगेडच्या नेतृत्वात जिल्ह्यातील गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज,कुरखेडा आदी तालुक्यातील शेकडो शेतकर्यांनी कर्ज मुक्तीचे अर्ज सादर केले.